Nagpur News: बुटीबोरी एमआयडीसीच्या टॅंकमध्ये भीषण स्फोट, सहा जण गंभीर जखमी
नागपूर शहरातील बुटीबोरी एमआयडीसीच्या टॅंकमध्ये भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nagpur News: नागपूर शहरातील बुटीबोरी एमआयडीसीच्या टॅंकमध्ये भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये सहा कामगार जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी कामगारांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु आहे अशी माहिती समोर आली आहे. (हेही वाचा- बोरीवली परिसरातील शिंपोली मेट्रो स्टेशन परिसरात BMC जलवाहीनी फुटली)
मिळालेल्या माहितीनुसार, इंडोरामा कंपनीतील टॅंक दुरुस्ती करताना हा स्फोट झाला आहे. धक्कादायक म्हणजे बुटीबोरी एमआयडीसीमध्ये हा दुसरा स्फोट आहे. या दोन्ही घटनेत सहा जण जखमी झाले आहे. इंडोरामा कंपनीतील कामगार जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टॅंकमध्ये वेल्डिंगचं काम सुरु होते त्यावेळी ही घटना घडली आहे.
नागपूरमध्ये या घटनांमुळे शहरात घबराट निर्माण झाले आहे. स्फोट झाल्यामुळे तात्काळ अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. घटनास्थळी आग विझवण्याचे काम सुरु झाले. घटनास्थळी पोलिस आणि अॅब्युलन्स देखील हजर झाली. त्यानंतर जखमींना घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयत दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सुरु आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.