Markadwadi: 'राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या', उत्तमराव जानकर यांचे Sharad Pawar यांच्या उपस्थितीत मोठे वक्तव्य
माळशिरस (Markadwadi) विधानसभा मतदारसंघातील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी थेट निवडणूक आयोग आणि राज्य आणि देशातील प्रशासकीय यंत्रणांनाच आव्हान दिले आहे.
माळशिरस (Markadwadi) विधानसभा मतदारसंघातील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी थेट निवडणूक आयोग आणि राज्य आणि देशातील प्रशासकीय यंत्रणांनाच आव्हान दिले आहे. ईव्हीएमद्वारे (EVM) घेण्यात आलेल्या निवडणुकीवर जोरदार आक्षेप घेत त्यांनी 'आमदार पदाचा राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान Ballot Paper Voting) घ्या' असे त्यांनी म्हटले आहे. ते मारकडवाडी येथील गावकऱ्यांसमोर आज (8 डिसेंबर) सकाळी बोलत होते. या वेळी मंचावर शरद पवार, जयंत पाटील आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक आयोग का घाबरलाय?
उत्तमराव जानकर यांनी म्हटले की, निवडणूक आयोग इतका का घाबरतोय? असा हा कसला आयोग आहे, जो संपूर्ण देशात एकाही मतदारसंघात बॅटेल पेपरवर निवडणूक घेत नाही. राज्यात आणि देशात इतक्या ठिकाणी निवडणूक झाली आहे. मग, एखादा अपवाद म्हणून एका तरी मतदारसंघात बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घ्यायला हरकत काय आहे. ईव्हीएम विरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार आहोत. निवडणूक आयोगाने ऐकले तर ठिक नाहीतर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहोत. काय व्हायचे ते होऊ द्या, पण निवडणूक बॅलेट पेपरवरच झाली पाहिजे. आजवर असे केव्हाच झाले नाही की, या गावातून मला आघाडी मिळाली नाही. मी आणि विजयसींह मोहिते पाटील एकमेकांच्या विरोधात होतो तेव्हादेखील मला या गावातून आघाडी मिळाली आहे. आता तर आम्ही एकत्र आहोत, मग असे काय झाले? की या गावातील आघाडी घटली? असा सवाल उपस्थित करत जानकर यांनी हल्लाबोल केला आहे.
मारकडवाडी ग्रामस्थांचा बॅलेट पेपरसाठी आग्रह
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये लागलेले निकाल अनेकांसाठी अनपेक्षीत आहेत. त्यामुळे ईव्हीएम द्वारे घेतल्या गेलेल्या या निवडणुकीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यातूनच सालोपूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघ जोरदार चर्चेत आला. या मतदारसंघातील मारकडवाडी नावाच्या गावाने बॅलेटपेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. या गावाने आपल्या गावात झालेले मतदान खरोखरच व्यवस्थित झाले आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे ठरवले.
गावकऱ्यांच्या समाधानासाठी गावाने आपल्या पातळीवर बॅलेट पेपरवर मदतान घ्यायचेही ठरवले. त्यासाठी मतदान केंद्र, मतपेटी आणि बुथही तयार करण्यात आला. पण, प्रशासनाला याची माहिती मिळताच प्रशासनाने गावात जमावबंदी आदेश लागू केला. गावकऱ्यांवर दबाव टाकत हे मतदान अवैध आहे असे सांगत ते करण्यास मज्जाव केला. त्यानंतर हे प्रकरण देशभर गाजले. शरद पवार यांनी आज या गावाला भेट दिली. त्यानंतर आगामी काळात राहुल गांधी हे देखील, या गावास भेट देणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)