IPL Auction 2025 Live

Marathi Bhasha Din 2020: राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गजांकडून मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!

मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधत राज ठाकरे, आदित्य ठाकरेंसह मान्यवरांनी शेअर केल्या खास शुभेच्छा

Marathi Rajbhasha Din 2020 | Photo Credits: File Photo

Marathi Rajbhasha Diwas 2020:  महाराष्ट्रासह जगभरात पसरलेल्या मराठी माणसांसाठी आजचा दिवस खास आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा या दिवसाचं औचित्य साधून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आज जगभरात विखुरलेली मराठी माणसं सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. या दिवसाच्या निमित्ताने कला, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील दिग्गजांनी देखील मराठी बांधवांना 'मराठी राजभाषा दिनाच्या' शुभेच्छा दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा ट्वीटरच्या माध्यमातून दिल्या आहेत.

27 फेब्रुवारी हा दिवस कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून मराठी भाषेचा वसा जपण्याचं काम विविध माध्यमातून केलं जातं. Marathi Bhasha Din 2020 Images: मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने 'या' खास HD Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

राज ठाकरे यांचे ट्वीट

आज मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी  अशी इच्छा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट

आदित्य ठाकरे यांचे ट्वीट

चंद्रकांत पाटील यांचे ट्वीट

आज विधिमंडळामध्ये देखील मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून शालेय शिक्षणामध्ये सार्‍या मंडळांसाठी मराठी भाषा शिकवणं अनिवार्य करण्यासाठी खास विधेयक आणले जाणार आहे. दरम्यान विधिमंडळात राज्य सरकारकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर त्यांच्यासोबतच इतर मराठी भाषा प्रेमी संस्थांकडूनही मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.