Ashish Shelar Statement: मराठी माणसांना न्याय मिळेल, मुंबईतील एनटीसी मिलच्या मैदानावरील चाळींचा पुनर्विकास होणार, आशिष शेलारांची माहिती

या मागणीसाठी भाजपने (BJP) केलेल्या पाठपुराव्याचे हे सर्वात मोठे यश आहे, असे मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले. मुंबईत एनटीसीच्या 11 गिरण्या असून या गिरणीच्या जमिनीवर उभ्या असलेल्या चाळींची दुरवस्था झाली आहे.

Ashish Shelar (Photo Credits-ANI)

मुंबईतील नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या (NTC) नऊ गिरण्यांच्या जमिनीवर ठिकठिकाणी असलेल्या अकरा चाळींचा आता पुनर्विकास केला जाणार आहे. राज्य सरकार (State Government) हा पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या (MHADA Project) माध्यमातून हाती घेणार आहे. मुंबईतील मराठी माणसांना हक्काचे घर मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी रविवारी केली. या मागणीसाठी भाजपने (BJP) केलेल्या पाठपुराव्याचे हे सर्वात मोठे यश आहे, असे मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले. मुंबईत एनटीसीच्या 11 गिरण्या असून या गिरणीच्या जमिनीवर उभ्या असलेल्या चाळींची दुरवस्था झाली आहे.

बृहन्मुंबई महापालिकेने या चाळी धोकादायक म्हणून घोषित केल्या होत्या. मात्र पुनर्विकासाची कोणतीही योजना नसल्याने या चाळी जीर्णच राहिल्या. मुंबई  भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे पाठपुरावा करून या चाळींच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा केला होता. कलम 33(7) नुसार या चाळींचा पुनर्विकास व्हायचा होता. आणि ही जमीन केंद्र सरकारच्या मालकीची असल्याने केंद्र सरकारने यासंदर्भात राज्य सरकारला परवानगी द्यायची होती. हेही वाचा Maharashtra Winter Update: महाराष्ट्रातील जनतेला हुडहुडी! पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कायम, जाणून घ्या कुठल्या राज्यात किती तापमान

याबाबत शेलार सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा करत होते. त्यांनी केंद्रीय मंत्रालयाला निवेदनही दिले होते. यातील काही चाळी गिरण्यांच्या आत होत्या. आणि म्हणूनच त्याच्या सीमारेषा निश्चित करणे आवश्यक होते. तसेच यातील काही चाळी या उपकरप्राप्त इमारतींतर्गत नसल्याने त्यांचा पुनर्विकास करणे अवघड होते. गोयल यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करून या चाळींच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार करून घेतला.

त्यासाठी केंद्राकडून परवानगी दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच, ही योजना हाती घेण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. आणि त्यामुळे या चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. या चाळींमध्ये जवळपास 1,892 कुटुंबे राहतात, ज्यात बहुसंख्य गिरणी कामगारांची मराठी कुटुंबे आहेत. त्यांना त्यांची हक्काची घरे त्याच ठिकाणी मिळायला हवीत असे आमचे मत होते आणि म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा करत राहिलो. हेही वाचा Alleged COVID 19 Centre Scam: बीएमसी कमिशनर Iqbal Singh Chahal ईडी कार्यालयात दाखल

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्रात येऊन राज्य सरकारशी चर्चा करून या चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. या रहिवाशांना म्हाडाच्या माध्यमातून हक्काची घरे मिळणार आहेत. गरिबांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून आभार मानतो, असे शेलार म्हणाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now