Marathi Nameplates on Shops: मुंबईत सर्व दुकानांवरील पाट्या मराठीतच, Liquor Shop वर महापुरुष, गड-किल्ल्यांच्या नावांना बंदी, नियमावली जाहीर

महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Marathi Devanagari | (File Image)

मुंबई शहरात यापुढे सर्व दुकानांच्या पाट्या (Nameplates of Shops) या पूर्णपणे मराठी भाषेत (Marathi Language) आणि ठळक टंक (Marathi Bold Font) स्वरुपात पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच, मुंबई महापालिकेनेसुद्धा (Brihanmumbai Municipal Corporation) याबाबत एक नियमावली जाहीर केली आहे. यापूर्वी इंग्रजी अथवा इतर भाषेमध्ये मोठ्या अक्षरांत दुकानाचे नाव असायचे आणि अगदीच छोट्या अक्षरांमध्ये मराठीत पाटी असायची. त्यातच दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांना तर हा नियमही लागू नव्हता. त्यामुळे त्या दुकानांवर इंग्रजीतच बोर्ड पाहायला मिळायचे. त्यामुळे आता नव्या नियमांनुसार मुंबईत सर्व दुकानांवर थेट मराठी भाषेतच बोर्ड पाहायला मिळणार आहेत.

मराठी भाषेतील नाव मोठे आणि ठळक असावे

राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या नियमानुसार दुकानांवरील नावाची पाटी ही पूर्णपणे मराठी भाषेत म्हणजेच देवनागरी लिपीत असणे आवश्यक आहे. मराठी शिवाय इतर कोणत्या भाषेत दुकानावर नामफलक असेल तर त्यापेक्षा मोठ्या अक्षरामध्ये मराठीतले नाव असायला पाहिजे. (हेही वचा, Marathi Nameplate on Shops: महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी नामफलक अनिवार्य, मुंबईतील 500 चौरस फुटांखालील घरांच्या करसवलतीसही राज्य सरकारची मान्यता)

ट्विट

दारु दुकानांना महापुरुष, गड-किल्यांच्या नावांना बंदी

ज्या दुकान अथवा अस्थापनांमध्ये मद्यविक्री केली जाईल त्या अस्थापना, दुकानांना यापुढे महापुरुष अथवा गड-किल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. ज्या दुकान, अस्थापनांना महापुरुष, गड-किल्ले यांची नावे दिली गेली आहेत. तसेच, जी दुकाने विद्यमान स्थितीत अस्तित्वात आहेत त्यांची नावेही आता बदलावी लागणार आहेत. संबंधित दुकानदारांनी नियमाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 च्या तरतुदीनुसार संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे.