Rohit Pawar On Hathras Case: मराठी पत्रकार 'चाय-बिस्कुट' खाऊन राहतील, पण प्रामाणिकपणा कधीचं विकणार नाहीत - रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) तसेच या घटेनेचे बेजबाबदारपणे वार्तांकन करणाऱ्या काही माध्यमांवर निशाणा साधला आहे.

NCP MLA Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

Rohit Pawar On Hathras Case: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे (Hathras Rape Case) संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांकडून उत्तर प्रदेश सरकारवर कडाडून टीका करण्यात येत आहे. अशातचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) तसेच या घटेनेचे बेजबाबदारपणे वार्तांकन करणाऱ्या काही माध्यमांवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विट हँडलवरून रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, 'हाथरसमध्ये पीडितेच्या कुटूंबियांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे. त्यांचे फोन हिसकावून घेतले गेले आहेत. घरात कुलूप लावले गेले आहे आणि संपूर्ण गावात पोलिसांनी तळ ठोकला आहे. मीडिया कर्मचाऱ्यांचे फोन टॅप करून दिशाभूल करणारे ऑडिओ व्हायरल केले जात आहेत आणि हा निर्लज्जपणा पहा' (हेही वाचा - Hatras Gang Rape: आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही 'दिशा कायदा' संमत करावा; हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर मनसेची राज्य सरकारकडे विनंती)

दरम्यान, रोहित पवार यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला असून यात रिपब्लिक टीव्हीचा एक रिपोर्टर रिपोर्टिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, 'बातमी दाखवण्याऐवजी बनावट बातम्या तयार करण्यासाठीचा हा नवीन प्रकार आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. याला सर्कस म्हणणे अधिक योग्य ठरेल. यापेक्षा कितीतरी पटीने माझे मराठी पत्रकार मित्र "चहा-बिस्किट" खातात पण, प्रामाणिकपणा कधी विकत नाहीत.'