राज्यभरात विभागनीय भरती होणार, मराठा समाजातील तरुणांना मोठा दिलासा
त्यामुळे ही नोकरी भरती तत्काळ सुरु केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शुक्रवारी विधान सभेत सांगितले होते
मराठा आरक्षणामुळे(Maratha Aarakshan) राज्य सरकारी सेवेतील 72 हजार पदांची महाभरती काही कारणांमुळे थांबविण्यात आली होती. त्यामुळे ही नोकरी भरती तत्काळ सुरु केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी विधान सभेत सांगितले होते. या भरतीमुळे मराठा समाजाच्या तरुणांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात मेघाभरतीसाठी येत्या 2019 च्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरकारी सेवेच्या भरतीसाठी परिक्षा घेतली जाणार आहे. तर पदांसाठी स्थगिती दिल्याने ती आता हटवण्यात आली असून तातडीने 72 हजार राज्यभरती सुरु झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. तसेच या भरतीसाठी पुढील आठवड्यात जाहिरात झळकविण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
तर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे.