Maratha Reservation: मराठा आरक्षणामुळे तरुणाची छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर आत्महत्या, संभाजी नगर येथील घटना

धक्कादायक म्हणजे, तरुणाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेऊन जीवन यात्रा संपवली आहे.

Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Suicide News: मागिल अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजवर अनेक तरुणांनी आत्महत्या करत स्वत:च जीवन संपवलं. तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथे आणखी एका मराठा तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक म्हणजे, तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेऊन जीवन यात्रा संपवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भररस्त्यात तरुणाने आत्महत्या केली. विजय पुंडलिक राकडे (३९ वय वर्ष) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्याने विजय बऱ्याच दिवस चितेंत होता. या चिंतेत त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.  खामगाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेतले. गावकऱ्यांना ही गोष्ट लक्षात येताच, गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतला. त्याला  तात्काळ रुग्णालयात दाखल केले. फुलंब्री येथील रुग्णालयातून त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालायत आणलं. परंतु प्रकृती गंभीर झाली आणि त्याचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची एक सुसाईट नोट पॅन्टच्या खिशात आढळली.

या घटनेची माहिती गावात पसरताच मोठी खळबळ उडाली. सुसाईट नोट मध्ये लिहले होते की, माझ्या मुलींना, मुलांचे शिक्षण शिकवण्यासाठी मी पूर्णपणे कटीबध्द असतानाही माझ्या‎ मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात‎ त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही‎. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण‎ मिळावे, यासाठी मी आत्महत्या करीत ‎आहे.