Maratha Reservation Suicide: परभणीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या,मराठा आरक्षण मिळत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल

परभणीतील सनपूर येथे ३४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Maratha Reservation Suicide: महाराष्ट्रात (Maharashtra) मराठा आरक्षणसाठी  (Maratha Reservation) आता पर्यंत अनेक तरुणांनी आत्महत्या केली. दरम्यान आणखी एका तरुणाने मराठा आरक्षणाकरिता (Suicide) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परभणीतील सनपूर येथे  ३४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. शनिवारी पहाटे ही घटना गावकऱ्यांच्या लक्षात आली.  (हेही वाचा- मराठा आरक्षणासाठी 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या, नांदेड येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. मयत तरुणाचेन सचिन राम शिंदे असं नाव आहे. तरुणाने मराठा आरक्षण मिळावे या करिता त्याने आत्महत्या केली. तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी देखईल आढळून आली. चिठ्ठीत लिहल्याप्रमाणे, मी सचिन रामराव शिंदे,  परभणीतील रहिवासी, मराठा आरक्षण मिळत नसल्याने मी, स्वत:ला संपवत आहे. तसेच पुढे एक मराठा लाख मराठा असंही लिहिलंय. राज्यात मराठा आरक्षणासाठी आजवर अनेक तरुणांनी आपलं जीवन संपवलं आहे.

 परभणी तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवले, या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. तरुणाचे कुटुंब हे शेतकरी वर्गातले आहेत. सरकारी नोकरी मिळावी या करिता अभ्यास करत होता. परंतु तरुणाने मराठ आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या केली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. राहत्या घरात गळफास घेतल्याचे समोर आले आहे.