Maratha Reservation: उद्यापासून आझाद मैदानावर मराठा आंदोलकांचे आमरण उपोषण; केली सरकारी अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी

जालना आंदोलनाबाबत सरकारच्या चुकीच्या कारभाराचा दाखला देत आंदोलक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

Maratha Reservation Protest (संग्रहित संपादित प्रतिमा)

जालना (Jalna) येथे मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर राज्यातील सामाजिक व राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज अनेक ठिकाणी ‘बंद’चे आवाहन करण्यात आले होते. आता महाराष्ट्रातील सकल मराठा समाज आणि मुंबईतील मराठा क्रांती महामोर्चाने मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. अमोल जाधवराव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

जालना आंदोलनाबाबत सरकारच्या चुकीच्या कारभाराचा दाखला देत आंदोलक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

जाधवराव म्हणाले, ‘जालन्यातील आंदोलन सुरुवातीला शांततेत होते, मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरपराध महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर लाठीचार्ज करवला. त्यांनी याची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता. त्याऐवजी परिस्थिती आणखी चिघळवली. जोपर्यंत ते राजीनामा देत नाहीत किंवा त्यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकले जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील.’ शिवाय, मराठा आरक्षणासाठीच्या समितीचे चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्व कुचकामी ठरले असून त्यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हावे, असा आग्रह जाधवरावांनी धरला. (हेही वाचा: Sambhaji Bhide: संभाजी भिंडे यांच्या विरोधारात पुण्यात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण)

दरम्यान, आज मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज पार पडली. यामध्ये मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif