मराठा आरक्षण: विधेयक विधिमंडळात येण्यापूर्वीच श्रेय घेण्यासाठी भाजपची जय्यत तयारी

मराठा आरक्षण कृती अहवाल आणि विधेयक आज (गुरुवार, २९ नोव्हेंबर) विधिंडळाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे.

मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या पटलावर ठेवले जाणार((Archived, edited, images)

मराठा आरक्षण विधेयक आज (29, नोव्हेंबर) विधिमंडळाच्या पटलावर मांडले जाणार आहे. विधेयकात आरक्षण नेमके कसे आणि किती मिळणार? याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता असतानाच भाजपच्या गोटात मात्र आरक्षणाचे श्रेय घेण्याची जोरदार तयारी सुरु आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार विधिमंडळात विधेयक आणत आहे. सभागृहात विधेयक पारित होताच टीव्हीवरील बातम्यांच्या आधारे कार्यालयाबाहेर आणि आपापल्या जवळच्या चौकांमध्ये जल्लोष करावा. मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावावेत अशा आशयाचा संदेश भाजप कार्यर्त्यांच्या व्हॅट्सअॅपवर फिरत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिणीने दिलेल्या वृत्तात, मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्याबाबत भाजपने जोरदार तयारी केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानाच्या अखेरच्या टप्प्यात मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण कृती अहवाल आणि विधेयक आज (गुरुवार, २९ नोव्हेंबर) विधिंडळाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. आरक्षणाबाबत विधिंडळ उपसमितीची बैठक बुधवारी पार पडली. त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. विधिंडळ कामकाज सुरु होण्यापूर्वी आज पुन्हा उपसमितीची बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी साडे दहा वाजता होईल. (हेही वाचा, मराठा आरक्षण: आरक्षण कृती अहवाल, विधेयक आज विधिमंडळाच्या पटलावर येणार; महाराष्ट्राला उत्सुकता)

(Photo Credit-SOCIALMEDIA)

अधिवेशन अंतिम टप्प्यात असल्याने इतरही अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमिवर विरोधक किंवा काही प्रमाणात स्वपक्षियांकडूनही होणारा दगाफटका टाळण्यासाठी सत्ताधारी भाजप-शिवसेनेने आपापल्या आमदारांना व्हिप जारी केले आहेत. हे व्हिप आगामी तीन दिवसांसाठी असणार आहेत. त्यामुळे व्हिप जारी केलेल्या सर्वच आमदारांना सभागृहात उपस्थित असणे बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे सत्ताधार भाजप शिवसेनेपाठोपाठ विरोधात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपापल्या आमदारांना व्हिप जारी केले आहेत.