Gopichand Padalkar: आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूरमध्ये मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक
गोपीचंद पडळकरांवरील चप्पलफेकीनंतर धनगर समाज आक्रमक झाला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
इंदापूरमध्ये (Indapur) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर मराठा (Maratha) आंदोलकांकडून चप्पलफेक करण्यात आली. याठीकाणी साखळी उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांनी, गोपीचंद पडळकरांना आपण येथे का आला आहात, असे विचारत त्यांच्या दिशेने चप्पल फेकल्याची माहिती ही मिळाली आहे. ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत इंदापुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर, रासप नेते महादेव जानकर व त्यांच्यासह राज्यभरातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. मात्र, सभा संपल्यानंतर आमदार पडळकर हे इंदापुरातील एका आंदोलन स्थळाला भेट देण्यासाठी गेले असता. ही घटना घडली आहे. (हेही वाचा - Dhangar Reservation Row: धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र; असंवेदनशीलतेने प्रकरण हाताळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर केली कारवाईची मागणी)
गोपीचंद पडळकरांवरील चप्पलफेकीनंतर धनगर समाज आक्रमक झाला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सदर प्रकारानंतर पडळकर हे घटनास्थळावरून निघून गेले. दरम्यान, मराठा आंदोलकांकडून पडकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
इंदापूरमध्ये ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर उपस्थित होते. इंदापूर येथील मराठा समाजाच्या सुरु असणाऱ्या आंदोलनाच्या जवळचं दूध उत्पादकांचं आंदोलन सुरु होतं त्याठिकाणी भेट देण्यासाठी गोपीचंद पडळकर गेले असता त्यांच्यावर चप्पलफेकेची घटना घडली.
(The above story first appeared on LatestLY on Dec 09, 2023 07:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

