मराठा आरक्षण नाकारल्याने मेडिकलचे विद्यार्थी पुन्हा एकदा आझाद मैदानात उतरले, अजित पवार यांनी भेट घेतली
मराठा समाजातील मेडिकल अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आरक्षण ऐन प्रवेशाच्या वेळी काढून घेतल्याने पुन्हा एकदा संतप्त विद्यार्थ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी देखील विद्यार्थ्यांची भेट घेतली.
Medical Students Protest For Reservation At Azad Maidan: मराठा समाजातील (Maratha Community) मेडिकल अभ्यासक्रमाचे (Medical Post Graduation Students) पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आरक्षण (Maratha Reservation) ऐन प्रवेशाच्या वेळी काढून घेतल्याने पुन्हा एकदा संतप्त नागरिकांनी निषेध करत मोर्चा काढला आहे.रविवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे (Maratha Kranti Morcha) राज्यातील वैद्यकीय शिक्षणात आरक्षण नाकारलेल्या 250 विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याचे घोषित करण्यात आले होते, त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आज सातव्या दिवशी विद्यार्थी व त्यांना समर्थन देण्यासाठी सामील झालेले मराठा क्रांती मोर्चातील सदस्य यांनी मुंबईच्या आझाद मैदानात (Azad Maidan) आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील विद्यार्थ्यांची भेट घेतली.
आरक्षणाच्या गोंधळाने त्रासलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अजित पवारांनी पुढाकार घेत काही विद्यार्थ्यांच्या सोबत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली तसेच विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे असे आश्वासन देखील पवारांनी ट्विटमार्फत केले आहे.
अजित पवार ट्विट
मराठा समाजातील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आज केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असून देखील अशा प्रकारे विद्यार्थ्यांना त्रास होणे सरकारचं अपयश आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच या विद्यार्थ्यांना फटका बसलाय. मग हे फडणवीस सरकार की, फसणवीस सरकार हा या विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकीचा ठरतो का? अशा आशयाचे एक ट्विट देखील अजित पवार यांनी केले आहे. Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार कधी? मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अजित पवार ट्विट
यंदाच्या शैक्षणिक वर्षात दंत वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. याच मुद्द्यावरून मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलंय.जर मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा देखील इशारा वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून देण्यात आलाय.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)