IPL Auction 2025 Live

Ramesh Kere Ttried to Attempt Suicide: फेसबूक लाईव्ह सुरू असताना मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरेंनी केला आत्महत्येचा प्रयत्न

या सर्व प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

Ramesh Kere Ttried to Attempt Suicide (PC - Facebook)

Ramesh Kere Ttried to Attempt Suicide: काही दिवसंपूर्वी मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक (Maratha Kranti Morcha Coordinator) रमेश केरे (Ramesh Kere) यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. हा आरोप सहन न झाल्याने आज आपली बाजू मंडण्यासाठी रमेश केरे यांनी फेसबूक लाईव्ह केले होते. फेसबूक लाईव्ह सुरू असताना केरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

माझी कथित ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून माझी बदनामी केली जात आहे. परंतु, मी आजपर्यंत समाजासाठी प्रामाणिक काम केलं आहे. मात्र, आता हे माझं तुमच्याशी फेसबुकच्या माध्यमातून शेवटच संभाषण असणार आहे, असे रमेश केरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं आहे. (हेही वाचा - Farmer Suicide in Parbhani: परतीच्या पावसाने सोयाबीनचं नुकसान झाल्याने 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या)

तथापी, फेसबुक लाईव्ह करताना रमेश केरे हे भावूक झाले. फेसबुक लाईव्ह दरम्यान ते म्हणाले की, आशा, अक्षर भैया, गौरी मला माफ करा, मी आजवर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आलो. परंतु, सोशल मीडियावर माझी जाणून बुजून बदनामी केली जात आहे. हे माझं शेवटचं फेसबुक लाईव्ह असणार आहे. एवढं म्हणून रमेश केरे यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण प्रकारानंतर रमेश केरे यांना तातडीने मुंबईतील जेजे रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.