Maratha Aarakshan Protest: मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारूनही मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर जाण्यावर ठाम

उद्या ते आझाद मैदानामध्ये प्रजासत्ताक दिन देखील साजरा करणार आहेत.

Manoj-Jarange-Patil | Twitter

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भगवं वादळ मुंबईच्या (Mumbai) दिशेने कूच करत आहे. मुंबई मध्ये शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानावर उपोषण करण्याच्या तयारीत मराठे मुंबई मध्ये दाखल होणार आहेत. अशामध्ये उद्या मुंबईत दाखल होणार्‍या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानासाठी परवानगी नाकारली आहे. परंतू जरांगे पाटीलांचा निर्धार कायम आहे. त्यांनी आपण आझाद मैदानावरच (Azad Maidan) जाणार असल्याचं म्हटलं आहे. 'मुंबई मध्ये मजा करायला जात नाही. तिथे जाण्याची मला हौसही नाही. सरकारने आरक्षण द्यावं आपणं गावी माघारी जाऊ' असं ते म्हणाले आहेत.

सरकारच्या शिष्टमंडळाकडून आज लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न झाले मात्र सरकारचा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळून लावली आहे. आता सरकारने आझाद मैदानामध्ये जागा पुरेशी नाही. त्याऐवजी नवी मुंबई मध्ये खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे पण तेही फेटाळत आझाद मैदानावर जाण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत. Maratha Aarakshan Protest: मनोज जरांगे आज नवी मुंबई मध्ये दाखल होणार; वाहनधारकांना पुणे एक्सप्रेस वे सह शहरातील 'हे' मार्ग टाळण्याचे आवाहन .

तोडगा काढण्याचं आवाहन

'माझ्या समाजाच्या वतीने माझी विनंती आहे, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तिघांनी चर्चा करावी, लगेच तोडगा काढावा. जुनं नवं शिष्टमंडळ येतं पण तोडगा निघत नाही. तिघापैकी एकाने येऊन तोडगा काढून जावं.' असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. सध्या मुख्यमंत्री सातारा मध्ये आपल्या गावी आहेत. तर दोन्ही उपमुख्यमंत्री मुंबई मध्ये आहेत.

आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील यांच्या टीमकडून स्टेज बांधण्याचं काम देखील सुरू झालं आहे. उद्या ते आझाद मैदानामध्ये प्रजासत्ताक दिन देखील साजरा करणार आहेत.



संबंधित बातम्या