Sanjay Raut on The Kashmir Files: 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटामध्ये दाखवलेल्या अनेक कथा खोट्या आहेत; संजय राऊत यांचा दावा
मात्र सत्य लपवण्यात आले असून अनेक खोट्या गोष्टी देण्यात आल्या आहेत. भाजपने या चित्रपटाचा प्रचार केला तर भाजप समर्थकांना हा चित्रपट पाहतीलचं. आता चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पद्मश्री देण्यात येईल.'
Sanjay Raut on The Kashmir Files: काश्मिरी पंडितांवरील (Kashmiri Pandits) अत्याचारांवर आधारित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट लवकरच 150 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो. विरोधी पक्ष सातत्याने 'द काश्मीर फाइल्स'ला विरोध करत आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या चित्रपटासंदर्भात वक्तव्य केलं आहे, 'काश्मीरवर चित्रपट बनला आहे. मात्र, यात सत्य लपवण्यात आले असून अनेक खोट्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.'
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, काश्मीरवर चित्रपट बनला आहे. मात्र सत्य लपवण्यात आले असून अनेक खोट्या गोष्टी देण्यात आल्या आहेत. भाजपने या चित्रपटाचा प्रचार केला तर भाजप समर्थकांना हा चित्रपट पाहतीलचं. आता चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पद्मश्री देण्यात येईल.' (हेही वाचा - The Kashmir Files Box Office Collection: विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाने केला विक्रम, चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा केला पार)
काश्मिरी पंडित अजून का परतले नाहीत?
संजय राऊत म्हणाले की, 'त्यांना वाय प्लस श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. काश्मिरी पंडितांचे तेथे खूप हाल झाले. पंतप्रधानांनी काश्मिरी पंडितांना घरी परतण्याचे आश्वासन दिले होते, मग ते आजपर्यंत का झाले नाही?'
काश्मीर मुद्दयावर राजकारण योग्य नाही -
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, काश्मीर हा संवेदनशील मुद्दा आहे. त्यावर राजकारण करणे योग्य नाही. काश्मीर फाईल्स हा फक्त एक चित्रपट आहे, येत्या निवडणुकीत त्याचा कोणाला राजकीय फायदा होईल असे वाटत नाही. निवडणुका येईपर्यंत चित्रपट निघून जाईल.
दरम्यान, अनेक भाजपशासित राज्यांमध्ये 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.