मुंबई: सेक्स करण्यास नकार दिल्याने मॉडेलची हत्या, मानसी दीक्षित खून प्रकरणात धक्कादायक खुलासा

त्याने तिच्यासोबत विनयभंग आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने दोरीच्या सहाय्याने तिचा गळा आवळला. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मानसीची हत्या केल्यानंतर मुजामिलने तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला. हा मृतदेह त्याने कारमधून अंधेरी येथून मालाडला आणला आणि माइंडस्पेस येथे घनदाट झाडीत फेकला.

Model Mansi Dixit (File Photo)

Mansi Dixit murder in Mumbai: फॅशन इंडस्ट्री आणि बॉलिवुड क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या मॉडेल मानसी दीक्षित (Mansi Dixit) हत्या प्रकरणात (Murder Case) धक्कादायक खुसाला पुढे आला आहे. केवळ सेक्सला नकार दिल्यानेच मानसी दीक्षित हिची हत्या झाली. फोटोग्राफर मुजामिल (Photographer Muzammil) याने तिची हत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्येही त्याबात उल्लेख करण्यात आला आहे.

पोलिसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मानसी दीक्षित हिची हत्या होण्याच्या काही दिवस आगोदरपासून मुजामील मानसी हिला ओळखत होता. त्या काळातच तो मानसीकडे आकर्शित झाला. दरम्यान, फोटोशूटच्या निमित्ताने त्याने मनसीला बोलावून घेतले आणि शरीरसंबंधांची मागणी केली. त्याच्या या विचित्र आणि आक्षेपार्ह मागणीला मानसीने विरोध दर्शवला. शरीरसंबंधांसाठी ती तयार व्हावी यासाठी मुजामील याने अनेक प्रयत्न केले. तिच्यावर दबाव टाकला. पण, ती बधली नाही. अनेक प्रयत्न करुनही मानसी आपल्या निर्णयावर ठाम आहे हे पाहून मुजामील संतापला. त्याने अत्यंत खूनशीपणे तिच्या (मानसी दीक्षित) डोक्यात लाकडी स्टूल मारला.

पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे की, मुजामिल याने केलेल्या हल्ल्यात मानसी बेशुद्ध पडली. त्याने तिच्यासोबत विनयभंग आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने दोरीच्या सहाय्याने तिचा गळा आवळला. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मानसीची हत्या केल्यानंतर मुजामिलने तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला. हा मृतदेह त्याने कारमधून अंधेरी येथून मालाडला आणला आणि माइंडस्पेस येथे घनदाट झाडीत फेकला. मानसीच्या शवविच्छेदन अहवालातही तिच्या गुप्तांगावर संशयास्पद अनेक खुणा आढळल्या. (हेही वाचा, अभिनेता गोविंदा याचा पुतण्या जन्मेंद्र अहुजाचा मृत्यू; राहत्या घरी सापडला मृतदेह)

मुंबई येथील मलाड येथे एका सूटकेसमध्ये 20 वर्षीय मॉडेल मानसी दीक्षित हिचा मृतदेह मिळाला होता. मानसी दीक्षित ही मूळची राजस्थान येथील कोटा येथील राहणारी आहे. मुंबईत शिक्षणासोबत ती मॉडेलिंगही करत असे. दरम्यान, तिची हत्या झाली. या प्रकरणात बांगूरनगर पोलिसांनी एका 19 वर्षीय फोटोग्राफर (मुजामिल) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर मानसी दीक्षित याच्या हत्येचा आरोप आहे.



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील