IPL Auction 2025 Live

Mira Road Murder Case: मीरा रोड खून प्रकरणातील आरोपी मनोज सानेला 6 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

Mira Road Murder Case | (File Image)

Mira Road Murder Case: ठाणे जिल्ह्यातील न्यायालयाने गुरुवारी लिव्ह-इन पार्टनरची हत्या आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा आरोप असलेल्या मनोज साने (Manoj Sane) ला 6 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 56 वर्षीय साने याने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मीरा रोड भागात सातव्या मजल्यावरील भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये आपली 32 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची हत्या केली होती.

आरोपीने सरस्वतीच्या शरीराचे अवयव चिरून ते शिजवले. गेल्या आठवड्यात, न्यायालयाने सानेच्या पोलीस कोठडीत 22 जूनपर्यंत वाढ केली होती, त्यानंतर त्याला न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग (जेएमएफसी) एम डी ननावरे यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी त्याला 6 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (हेही वाचा -Darshana Pawar Death Case: दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरे याला अटक)

दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी केस डायरीही कोर्टात सादर केली. पोलिसांनी 7 जून रोजी वैद्य यांच्या शरीराचे चिरलेले अवयव ताब्यात घेतले होते. 4 जून रोजी तिची हत्या झाल्याचा संशय आहे, त्यानंतर सानेने तिच्या शरीराचे अवयव बादलीत भरले, काही मांसांचे तुकडे उकळले आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी ते कुत्र्यांना खाऊ घातले.

या घटने धक्कादायक मर्डर मिस्ट्रीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते की, त्यांनी या गुन्ह्यासंदर्भात 20 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. सानेच्याा फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला होता.