सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारची मुदत आज संपणार; Manoj Jarange यांच्या शांतता रॅलीचा आज Chhatrapati Sambhajinagar मध्ये समारोप

त्याशिवाय आज 13 जुलै रोजी सगेसोयऱ्यांच्या अटीसह मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आद्यादेश काढण्यासाठी सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत आहे.

Photo Credit - X

Manoj Jarange Patil Chhatrapati Sambhajinagar Rally: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)शांतता रॅली आणि सभा घेतल्यानंतर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅलीचा समारोप करणार आहेत. त्याशिवाय आज 13 जुलै रोजी सगेसोयऱ्यांच्या अटीसह मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आद्यादेश काढण्यासाठी सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत आहे. दरम्यान, रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक एकत्र येणार असून शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शहरातील सिडको चौकातून सकाळी 11.30 या रॅलीला सुरुवात होऊन नंतर क्रांती चौक येथे समारोप होणार आहे. हिराली सिडको चौक ते क्रांतीचौकापर्यंत असल्याने केंब्रिज चौक ते नगर नाका चौक तसेच कोकणवाडी चौक ते सिल्लेखाना चौक हे रस्ते बंद राहणार आहेत.

चौकाचौकात जय्यत तयारी करण्यात आली आहे. रॅलीच्या मार्गावर 250 भोंगे, 5 हजार झेंडे लावण्यात आले असून शहरात ठिकठिकाणी 800 बॅनर लावण्यात आले आहेत.13 ठिकाणी स्वागतासाठी कमानी बांधण्यात आल्या आहेत. रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र येण्याची शक्यता आहे. या दरम्यान, त्यांच्या जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील वेगवेगळ्या 8 चौकांमध्ये तब्बल 300 क्विंटल जेवण तयार ठेवण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif