Maratha Reservation protest: आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला नकार, पोलिसांनी पाठवली नोटीस
परंतु आझाद मैदानात उपोषण नकारण्यात आला आहे.
Maratha Reservation protest: गेले अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण हा प्रश्न काही सुटेना. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी या मैदानात उडी मारली. सरकारला जाग यावे आणि मागणी पुर्ण व्हावी याकरीता मागील वर्षांपासून ते मराठा आरक्षणाचे प्रश्न सुटावे या करीता उपोषण करीत आहे.सुरुवातीला ते गावापासून आंदोलन सुरु केले ते आता शहरा शहरात जाऊन आंदोलन करताना दिसत आहे. दरम्यान 26 जानेवारीला मनोज जरांगे पाटील लाखोंच्या संख्येने आंदोलके घेऊन मुंबईला येणार असल्याची चर्चा रंगली आहे. परंतु आझाद मैदानात उपोषण नकारण्यात आला आहे. (हेही वाचा- मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त लोणावळ्यात, मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू)
दरम्यान, मुंबई पोलिसांनी या उपोषणाला नकार दिला असल्याचे समोर येत आहे. मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी नाकारण्यात आली आहे. आझाद मैदान हे खेळासाठी राखीव असलेल्याने या मैदानात उपोषण करण्याची परवानगी नाही असं उत्तर आझाद मैदान पोलिसांनी नोटीस दिली आहे. मुंबईल आंदोलनासाठी लाखाेच्या संख्येने आंदोलक उतरणार असल्याने या मैदानाची इतकी क्षमता नसल्यांच पोलिसांनी कारण दिलं आहे. लाखोंच्या संख्येने येणारे आंदोलक या मैदानाता सामावून घेता येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी पर्याय सुचवला आहे. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क सुचवलं आहे.
उद्या मनोज पाटील यांचा उपोषण आझाद मैदानात असल्याने मैदानात जय्यत तयारी सुरु आहे. उद्या २६ जानेवारीला झेंडावंदन याच मैदानात होणार अशी माहिती वीरेंद्र पवार यांनी माहिती माध्यमांना दिली.मुंबईत वाहतुक कोंडीमुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते त्यामुळे आझाद मैदानात उपोषन नाकारण्या आले आहे.