Muslim OBC Reservation: राज्यातील मुस्लिमांना ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची खळबळजनक मागणी
जरांगे यांच्या मुस्लिम ओबीसी आरक्षण (Muslim Reservation) मागणीमुळे सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्ष (Maratha Reservation) मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यातील मुस्लिम समाजालाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Muslim OBC Reservation) द्या अशी मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. जरांगे यांच्या मुस्लिम ओबीसी आरक्षण (Muslim Reservation) मागणीमुळे सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्या कुणबी म्हणून नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे या मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातूनच (OBC Category) आरक्षण देण्यात यावे. कसे मिळत नाही तेच मी पाहतो, असे आव्हानात्मक विधान जरांगे पाटील यांनी आज (23 जून) केलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
'फक्त गोड बोलू नका, आरक्षण द्या'
मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केलेल्या विधान आणि मागणीचे जोरदार पडसात उमटण्याची शक्यता आहे. या आधी ओबीसी समाजाचे आरक्षण कोणत्या निकषांवर दिले? असा सवाल विचारताना जरांगे पाटील यांनी म्हटले की, उदा. म्हणून सांगायचे तर तुम्ही जर माळी समाजाला त्यांचा व्यवसाय म्हणून ओबीसी आरक्षण दिले तर आम्ही तुम्हाला मराठ्यांचाही व्यवसाय दाखवतो. ते शेती करतात म्हणून त्यांना आरक्षण असेल तर आम्हीही (मराठा) शेती करतो. आम्ही प्रश्न विचारत आहोत, आम्हाला उत्तर द्या. उगाच आमच्याशी फक्त गोड बोलू नका. आजवर आम्ही आपले खूपच लाड पुरवले. आमचा ओबीसी किंवा इतरांना विरोध नाही. आम्हाला आमच्या हक्काचे मराठा आरक्षण हवे आहे. तुम्हाला संविधानानुसार सर्व काही हवं आहे ना? तर आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या व्यवसायांच्या आधारावर तुम्ही आरक्षण दिलेच कसे? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. (हेही वाचा, Laxman Hake Jalna Hunger Strike: लक्ष्मण हाके यांचे उपोषण स्थगित, राज्य सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय)
''आरक्षण कसे देत नाहीत तेच पाहतो''
मनोज जरांगे पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, अनेक ठिकाणी वेगवेगल्या नोंदी सापडत आहेत. खास करुन काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्याही कुणबी नोंदी निघाल्या आहेत. याशिवाय लिंगायत, मारवाडी, ब्राह्मण, लोहार आदि समाज्याच्याही नोंदी कुणबी म्हणून आढळून आल्या आहेत. जर सरकार दरबारी दप्तर उपलब्ध असेल आणि त्यांच्या नोंदी कुणबी अशा असतील तर मुस्लिमांनाही आरक्षण ओबीसी प्रवर्गातूनच मिळायला हवं. त्यांच्यावरही अन्याय होऊ नये. कायद्याचा मुद्दा आहे तर कायद्यानेच बोला. पाशा पटेल नावाच्या गृहस्थांची नोंदही कुणबी म्हणूनच निघाली आहे. त्यामुळे जर मुस्लिम सरकारच्या दरबारी जर तशा नोंदी असतील तर राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं पाहिजे अशी ठाम मागणी जरांगे यांनी केली. आरक्षण आम्ही घेतच असतो. कसे देत नाहीत तेच पाहतो, असे जवळपास थेट आव्हानच जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिले आहे.