Manoj Jarange Patil Big Allegations on Government: मनोज जरांगे यांच्या राज्य सरकारवर गंभीर आरोप; मराठा आरक्षण आंदोलनाचे काय होणार?

त्यातच त्यांनी मुंबईमध्ये (Mumbai) आंदोलनाला दाखल होण्यापूर्वी राज्य सरकारवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. राज्य सरकार आपल्या भोवती ट्रॅप लावत आहे.

Manoj Jarange Patil | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मरठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील सुरुवातीपासून आक्रमक आहेत. त्यातच त्यांनी मुंबईमध्ये (Mumbai) आंदोलनाला दाखल होण्यापूर्वी राज्य सरकारवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. राज्य सरकार आपल्या भोवती ट्रॅप लावत आहे. आपल्यातीलच काही मंडळींना राज्य सरकारने फूस लावत आपल्याविरुद्ध षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सध्याची वेळ ही व्यक्तीगत स्वार्थ पाहण्याची नाही तर, समाजासाठी काही करण्याची आहे. सरकारला सामिल असलेले लोक कोण आहेत, हे आम्हाला हळूहळू लक्षात येत आहे. पण त्यांची नावे अजून पुढे आली नाहीत. ती एकदा आली की मग पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आमच्यातीलच काही लोक गडबड करत आहेत

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, माझ्याबद्दल षडयंत्र रचले जात आहे. पण, ही माझ्यापर्यंत आलेली माहिती आहे. मी अजून तिच्या खोलात गेलो नाही. त्यामुळे मी या माहितीला अद्याप खरे मानले नाही. पण आमच्यातीलच काही लोक गडबड करत असल्याचे आमच्या पाहणीत येते आहे. त्यासाठी राज्य सरकार जोरदार प्रयत्न कत आहे. या लोकांबरोबर राज्यातील विविध ठिकाणी बैठका पार पडत आहेत. कधी ती मुंबई, पुणे, सातारा, नाहितर नागपूर अशा एक ना अनेक ठिकाणी हे लोक भेटत आहेत. मी सरकारला मॅनेज होत नाही आणि फुटतही नाही त्यामुले आता षडयंत्र रचून बाद करण्याासाठी प्रयत्न केले जात आहे. (हेही वाचा, Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात दोघांनी संपवलं जीवन)

दुकानदाऱ्या बंद झाल्याने अनेक लोक समाजाच्या जीवावर उठले

मराठा समाजाच्या जीवावर मोठे झालेलेच नेते आता मराठा समाजाच्या जीवावर उठले आहेत. आजवर त्यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर समाजाच्या डोळ्यात धुळफेक करुन स्वत:ची दुकानदारी चालवली. आता मराठा समाजाला काही मिळण्याची वेळ आली तर ते यात खोडा घालू पाहात आहे. अनेकांच्या दुकानदाऱ्या समाजाने बंद पाडल्या आहेत. मी समाजालासोबत घेऊन आरक्षणाचा मुद्दा संपविण्यासाठी निघालो आहे. तर या लोकांना वाईट वाटायला लागले आहे. म्हणूनच हे सर्व नाटक घडवून आणले जात असल्याचा घणाघाती आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. (हेही वाचा, Maratha Reservation: 'आता आणखी वाटाघाटी नाहीत'; मराठा आरक्षण कार्यकर्ते Manoj-Jarange Patil 20 जानेवारीपासून मुंबईत उपोषणाच्या निर्णयावर ठाम)

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी सरकारमधील मंत्र्यांनी आपल्यातीलच काही लोकांना हाताला धरलं आहे. हे लोक आपल्या रॅलीमध्ये गोधळ घालू शकतात. त्यामुळे सर्वांनी सावध राहा. आपला असो किंवा परका. कोणीही गोंधळ घालत असेल त्याला थेट बाहेर काढायचा आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचा. इथे कोणी नेता व्हायला आले नाही. सर्वजण जे आलेत ते समाजाच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. मलाही नेता व्हायचे नाही. जर आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला तर मी थेट यातून बाहेर पडेल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.



संबंधित बातम्या