Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मनोज जरंगे फॅक्टर अपयशी; मराठवाड्यात महायुतीला भक्कम पाठिंबा

मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलन महायुतीच्या यशात अडथळा ठरेल, अशी अपेक्षा असतानाही महायुतीने मराठवाड्यात चांगली कामगिरी केली आहे.

Manoj Jarange, Devendra Fadnavis (फोटो सोजन्य - इन्स्टाग्राम)

Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांसंदर्भात (Maharashtra Assembly Election Results 2024) एक्झिट पोलने (Exit Poll) वर्तवलेला अंदाज अखेर खरा ठरला आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुतीला 225 जागांचा आकडा ओलांडण्यात यश आलं आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलन (Maratha Reservation Movement) महायुतीच्या यशात अडथळा ठरेल, अशी अपेक्षा असतानाही महायुतीने मराठवाड्यात (Marathwada) चांगली कामगिरी केली आहे.

गेल्या काही महिन्यांत विशेषत: मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्याने लक्ष वेधले होते. जरांगे यांच्या प्रभावासोबतच हा मुद्दा भाजप आणि महायुतीवर नकारात्मक परिणाम करेल, असे अनेकांना वाटत होते. लोकसभेत जरांगे फॅक्टरला चांगलेचं यश मिळाले होते. मात्र, आज लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निकालाने विश्लेषक आणि मतदारांना चकित केले आहे. (हेही वाचा - Sarita Fadnavis Reaction to Devendra Fadnavis Victory: 'माझा मुलगाच मुख्यमंत्री होणार'; महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांची प्रतिक्रिया)

मराठवाड्यात 46 पैकी 36 जागांवर महायुती आघाडीवर -

मराठवाड्यातील विधानसभेच्या 46 पैकी 36 जागांवर महायुती आघाडीवर आहे. यावरून हे स्पष्ट होते की, जरांगे फॅक्टरने अपेक्षेप्रमाणे मतदारांच्या भावनांवर प्रभाव टाकला नाही. तथापी, राज्यात महायुतीच्या अनेक प्रमुख उपक्रम आणि घोषणांनी निवडणूक निकालांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या "बटेंगे तो कटेंगे" आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक है तो सुरक्षित है" सारख्या प्रभावी घोषणेचा मतदारांवर परिणाम झाल्याचं चित्र या निकालात दिसून येत आहे. (हेही वाचा -Maharashtra Assembly Election Results 2024: परळीत धनंजय मुंडे यांचा 50 हजारहून अधिक मतांनी विजय)

तथापी, विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहिण योजनेचा मोठा फायदा झालेला पाहायला मिळत आहे. राज्यातील महिलांनी निवडणुकीत सहभाग घेऊन महायुती सरकारला पाठिंबा दिल्याने अनेक ठिकाणी भाजप, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठे यश मिळाले.

महाविकास आघाडीला मोठा झटका -

तथापी, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा झटका बसला असून, राज्यभरात त्यांचा प्रभाव लक्षणीयरित्या कमी झाला आहे. मराठवाड्यात महायुतीला मिळालेल्या आश्चर्यकारक यशाने मनोज जरंगे यांच्या आंदोलनाच्या भवितव्यावर आणि रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या निकालापूर्वी आलेले एक्झिट पोल एनडीए सरकार स्थापन करण्याच्या बाजूने होते. मात्र, आता निकालात एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले आहे. भाजप सलग तिसऱ्यांदा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.