Manoj jarange Patil: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार, उपोषणाचा चौथा दिवस

जरांगे पाटील यांचे गेल्या 3 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यातच जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांनी आता उपचार घेण्यास नकार दिला आहे.

Manoj Jarange Patil | Twitter

Manoj jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणात सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील यांचे गेल्या 3 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यातच आज मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. (हेही वाचा:Manoj Jarange Patil SIT Enquiry: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची एसआयटी चौकशी; राज्य सरकारचा निर्णय )

'आमरण उपोषण सुरू आहे तरी सरकार जाणूनबुजून बैठका घेत आहे. सरकारला काळजी असती तर त्यांनी दखल घेतली असती. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. त्यांना मराठे चांगला हिसका दाखवतील,' असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. यादरम्यान, त्यांनी छगळ भुजबळ यांच्यावरही टिका केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now