राफेल प्रकरणात मनोहर पर्रिकर यांनी नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल केले: पृथ्वीराज चव्हाण

न्यायलय ही काही स्वतंत्र तपास संस्था नाही. समोर आलेल्या साक्षी पुराव्यांच्या आधारे न्यायालय निर्णय देत असते. त्यामुळे राफेल प्रकरणाची चौकशी करायची असेल तर हे प्रकरण सीबीआय किंवा जेपीसीकडे सोपवले जावे. त्यातूनच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल असेही चव्हाण यांनी या वेळी म्हटले.

Manohar Parrikar Parrikar Blackmailed Pm Modi On Rafale Issue Prithviraj Chavan sensational allegations | (Photo credit: archived, edited, representative image)

राफेल (Rafale) विमान खरेदी प्रकरणाची फाईल आपल्याकडे आहे असे सांगून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ( Manohar Parrikar ) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Mod) यांना ब्लॅकमेल करत असल्याचा सनसनाटी दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आपली प्रकृती नाजू असतानाही पद सोडायला तयार नाहीत. राफेलची फाईल पर्रिकर यांच्याकडे असल्यामुळेच पंतप्रधान मोदी हे पर्रिकर यांना धक्का लाऊ शकत नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझा या वाहिणीशी बोलताना हा दावा केला आहे. पुढे बोलताना चव्हाण म्हणतात, राफेल प्रकरणाची फाईल आपल्याकडे असल्याचा पर्रिकर यांनी केलेला दावा म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्यावर हा गंभीर आरोप आहे. राफेल प्रकरणाची मूळ फाईल संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे. तर, मग या प्रकरणातील फाईलमधील एक एक कागद प्रसारमाध्यमांकडे कसा काय येत आहे, असा सवाल करत या प्रकरणाची दुसरी फाईल ही शंभर टक्के पर्रिकर यांच्याकडेच असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. दरम्यान, याविषयी काही लोकांशी आपले बोलणं झाल्याची पुस्तीही चव्हाण यांनी यावेळी जोडली.

दरम्यान, राफेल प्रकरणात न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली. न्यायलय ही काही स्वतंत्र तपास संस्था नाही. समोर आलेल्या साक्षी पुराव्यांच्या आधारे न्यायालय निर्णय देत असते. त्यामुळे राफेल प्रकरणाची चौकशी करायची असेल तर हे प्रकरण सीबीआय किंवा जेपीसीकडे सोपवले जावे. त्यातूनच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल असेही चव्हाण यांनी या वेळी म्हटले. राफेल प्रकरणात 30 ते 35 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. राफेलच्या किमतीतच जर घोटाळा झाला असेल आणि सरकार त्या किमतीच सांगणार नाही असे म्हणत असेल तर असे कसे होईल, असेही चव्हाण म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif