IPL Auction 2025 Live

डेक्कन कवीन, पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल; इथे पहा वेळापत्रक

महाराष्ट्रात कोरोना संकटातील दुसरी लाट ओसरत असल्याने आता रेल्वे प्रशासनाकडून काही मार्गांवर पुन्हा ट्रेन्स सुरू केल्या आहेत.

Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

कोरोना वायरसची दुसरी लाट आता महाराष्ट्रासह देशभरात ओसरत असताना पुन्हा निर्बंध थोडे शिथिल करत नागरिकांसाठी रेल्वे सएवा सुरळीत केल्या जात आहे. मध्य रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज (25 जून) पासून 4 विविध मार्गांवर बंद असलेल्या रेल्वेसेवा पुन्हा सुरू होत आहेत. यामध्ये जालना, नाशिक, मुंबई, पुणे यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई नाशिक पंचवटी एक्सप्रेस (Manmad Mumbai Panchvati Express), सीएसएमटी जालना जनशताब्दी एक्सप्रेस (Mumbai Jalana Jan Shatabdi Express), मुंबई-पुणे डेक्कन क्वीन (Deccan Queen) या रेल्वे सेवांचा समावेश आहे. नक्की वाचा: Deccan Queen: मुंबई व पुणे दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन 26 जून पासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत; Vistadome Coach मुळे प्रवास होणार अधिक सुखकारक.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये प्रवासी संख्या रोडावल्याने काही मार्गांवर रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र आता लसीकरण वेगवान करण्यासोबतच संसर्ग संक्रमणाचा वेग मंदावला असल्याने काही कार्यालयं पुन्हा सुरू झाली आहे. नागरिकांची वर्दळ सुरू झाली आहे सोबतच सण सणावार सुरू झाल्याने आता रेल्वे सेवा पुन्हा ट्रॅक वर येण्यास सुरूवात झाली आहे.

मध्य रेल्वेचं ट्वीट

दरम्यान आजपासून सुरू होणार्‍या ट्रेनचं बुकिंग सामान्य शुल्कासहच पुन्हा ऑनलाईन सुरू झाले आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईट वरून तुम्ही या ट्रेनचं बुकिंग करू शकणार आहात. मुंबई पुणे मार्गावरील डेक्कन क्वीनलाही आता विस्टाडोम कोच लावण्यात आला आहे. त्यामुळे या ट्रेनने प्रवास करणार्‍यांना एक विशेष अनुभव मिळणार आहे.