नशेच्या गोळ्या देऊन तरुणीसोबत शरीरसंबंध; आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकले; अहमदनगर जिल्ह्यातील तरुणास सांगली पोलीसांकडूनअटक
अजय उर्फ अविनाश संजय पवार असे या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. या तरुणाने तरुणीची फसवणूक केली. तसेच, तिच्यासबतच्या शरीरसंबंधावेळचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा संजय पवार याच्यावर आरोप आहे.
लग्नाचे आमिष दाखवून आणि नशेच्या गोळ्या देऊन एका 22 वर्षीय तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवल्या प्रकरणी एका तरुणास सांगली ( Sangli) शहर पोलीसांनी कारवाई करत अटक (Arres) केली आहे. अजय उर्फ अविनाश संजय पवार असे या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. या तरुणाने तरुणीची फसवणूक केली. तसेच, तिच्यासबतच्या शरीरसंबंधावेळचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा संजय पवार याच्यावर आरोप आहे.
प्राप्त माहितीनुसार, या तरुणाने 22 वर्षी मुलीसोबत प्रेमाचे नाटक करत तिला सोबत विवाह करण्याचे आमिष दाखवले. या आमिषातून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच, तिची फसवणूक करत तिला नशेच्या गोळ्या दिल्या. नशेच्या गोळ्यांमुळे पीडितेचे स्वत:वरील नियंत्रण सुटल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले असा या तरुणावर आरोप आहे. दरम्यान, सांगली पोलीसांनी या तरुणावर बदनामी, फसवणूक, बलात्कार असे गुन्हे दाखल केले आहेत. (हेही वाचा, आंतरजातीय विवाह: लेकीसह जावयाला पेटवले; अहमदनगर येथील घटना)
दरम्यान, पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन सांगली पोलीसांनी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 07, 2019 08:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

