IPL Auction 2025 Live

Baramati Crime: विजबील अधिक आल्याच्या रागातून महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याची हत्या

मात्र, महावितरणने कोणतीही कार्यवाही न केल्याने अभिजीत पोटे याने महिला कर्मचाऱ्यांच्या डोक्यात कोयता मारला

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बारामतीमधील (Baramati) महावितरण कार्यालयात एका संतप्त ग्राहकाने येथील महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात चक्क कोयता मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर तत्काळ बारामतीमधील सुपे पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. बारामती तालुक्यातील मोरगाव येथे महावितरण कंपनी कार्यालयात एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने येथील महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक  हल्ला केला. (हेही वाचा - Gondia Rape and Murder Case: गोंदिया मध्ये 12 वर्षीय चिमुकलीची बलात्कार करून हत्या; घटनास्थळी आढळला रक्ताने माखलेला दगड)

लाईट बिल जास्त येत आहे, त्यामुळे मीटर चेक करावा अशा आशयाची तक्रार महावितरणकडे या आरोपीने केली होती. मात्र, महावितरणने कोणतीही कार्यवाही न केल्याने अभिजीत पोटे याने महिला कर्मचाऱ्यांच्या डोक्यात कोयता मारला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कोयत्याचा गंभीर वार बसल्याने उपचारादरम्यान, महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. बारामतीमधील घटनेनंतर महिलेला उपचारासाठी पुण्याला नेण्यात येत होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, याप्रकरणी बारामतीतील सुपे पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती होती. पण, महिलेचा मृत्यू झाल्यामुळे आता याप्रकरणी 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयताच घातल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी कसून तपास करावा अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.