Pune Shocker: मुलासोबतच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या बोटाचा पतीने घेतला चावा, नराधमाला अटक

त्यानंतर महिलेने आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

Photo Credit- Pixabay

Pune Shocker: पुण्यात घरगुती भांडणात पतीने त्याच्या पत्नीचे बोट चावल्याची धक्कादायक घटना घडली (Man Bites Off Wife Finger) आहे. शनिवारी, 14 सप्टेंबर रोजी खेड तालुक्यात (Khed Taluka) ही घटना घडली. संजू पासवान (35) असे जखमी पत्नीचे नाव आहे. महिलेने पतीविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सूरज पासवान (40) याला अटक केली. आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 117 (2) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा:Delhi Shocker: क्षुल्लक कारणावरून आईला मारहाण केल्याप्रकरणी रागाच्याभरात अल्पवयीन मुलाकडून वडिलांची हत्या)

पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला एका खाजगी कंपनीत मजूर म्हणून काम करते. महिलेचा पती सूरज पासवान याचे शनिवारी दुपारी त्यांच्या मुलासोबत भांडण झाले. जेव्हा महिलेने भांडण थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला तेव्हा पतीने कथितपणे तिच्या उजव्या हाताचे बोट चावले. तयानंतर महिलेने आळंदी पोलिस ठाण्याच्या तक्रार दाखल केली. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. कथित गुन्हा घडला तेव्हा आरोपी दारूच्या नशेत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेचा गळा दाबला होता. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. (हेही वाचा: Madhya Pradesh Shocker: तोंड दाबून डोळ्यात भरली चटणी, संपत्तीसाठी शेजारणीला मारहाण; पीडितेची प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु)

महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:

चाइल्डलाइन इंडिया – 1098; हरवलेली मुले आणि महिला – 1094; महिला हेल्पलाइन - 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग – 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन – 7827170170; पोलीस महिला आणि ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन - 1091/1291.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif