Manoj Jarange Patil Dasara Melava Speech: विधानसभा आचारसंहिता लागेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा सुट्टी नाही! मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने मराठा समाजाला OBC मधून आरक्षण द्यावे, अन्यथा विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार पाडणार, असा इशाराही जरांगे यांनी महायुती सरकारला दिला आहे.

Manoj Jarange Patil (Photo Credit - You Tube)

Manoj Jarange Patil Dasara Melava Speech: मराठा समाजाला जर न्याय मिळाला नाही तर, आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार आहे. आमच्यावरच अन्याय का? जहागीरदाराची अवलाद आली तरी मराठा समाज झुकणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) आज बीड जिल्ह्यातील नारायणगड (Narayangad) येथे महायुती सरकार (Mahayuti Government) ला दिला आहे. राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने मराठा समाजाला OBC मधून आरक्षण द्यावे, अन्यथा विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार पाडणार, असा इशाराही जरांगे यांनी महायुती सरकारला दिला आहे.

दसरा मेळाव्यात काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी जमेल. परंतु, नजर पोहोचत नाहीत, तिथपर्यंत लोक जमले आहेत. पाडळशिंगी पर्यंत चारही मार्ग लॉक आहे. बीडमध्ये सर्व रस्ते जाम आहेत. मला वाटलं नव्हतं आपण या ताकदीने एकत्र येताल. मराठा समुदायावर संस्कार आहेत. हे संस्कार कधीच जातीवाद करत नाहीत. मराठा समुदाय राज्यात समुद्रासारखा पसरला आहे. मात्र, आपला समाज कधीच मस्तीत आणि मग्रुरीत वागत नाही, असंही जरागे पाटील यावेळी म्हणाले. मराठा समाजाची मुले प्रशासनात गेले पाहिजे. परंतु, त्यांना जाऊ द्यायचे नाही, अशी काही लोकांची इच्छा आहे. त्यामुळे आपण त्यांना अधिकारी पदावर नेल्याशिवाय शांत बसायचे नाही, असे आवाहनही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलं. (हेही वाचा - Dasara Melava 2024: दसरा मेळावा आणि राजकीय तलवारबाजी; राज्यात आज एकनाथ शिंदे , उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे,मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकांकडे लक्ष)

जरांगे पाटलांनी मराठा समाजाकडून मागितले वचन - 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मराठा बांधवांकडून एक वचन मागितले. याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मला तुमच्याकडून जास्त काही नको. तुम्ही फक्त मला एकच वचन द्या. त्यानंतर मी तुम्ही म्हणालं ते करेल. फक्त हट्ट धरू नका. मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. पण मला तुमच्याकडून एकच वचन हवे आहे. तुमचं हित सोडून मी तुमच्या पुढे जाणार नाही, असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मराठा समाजाला दिले.