Mahim Vidhan Sabha: माहिमचा हलवा कोणाचा? उद्धव ठाकरे यांचा उमेदवार मैदानात; सदा सरवणकर आणि मनसे प्रमुखांच्या चिरंजीवांसमोर आव्हान
तर स्थानिक आमदार सदा सरवणकर आणि मनसे नेते अमित ठाकरे हे देखील मैदानात उतरले आहेत.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाने उमेदवार जाहीर केला आणि माहीम विधानसभा मतदारसंघ अधिक चर्चेत आला. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) स्वत: या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. संयुक्त असल्यापासून शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ स्थानिक आमदार सदा सरवणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने आगोदरच चर्चेत होता. त्यात आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्ष येथे कोणाला उमदवारी देतो याबाबत उत्सुकता होती. अखेर शिवसेना (UBT) पक्षाने महेश सावंत () यांचे नाव जाहीर केले आणि या मतदारसंघातील लढती स्पष्ट झाल्या. तिनही उमेदवार हायप्रोफाईल असल्याने 'माहीमचा हलवा' कोणाला भेटणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
अमित ठाकरे यांच्यासाठी आव्हान
माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर हे सध्या स्थानिक आमदार आहेत. शिवसेना पक्षातील फुटीनंतर ते मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ अतिशय प्रतिष्ठेचा ठरला होता. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आपले चिरंजीवच मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे सहाजिकच राजकीय कुतुहल वाढले होते. राजकीय वर्तुळात असे आडाखे बांदले जात होते की, शक्यतो शिवसेना (UBT) पक्षाकडून उमेदवार जाहीर केला जाणार नाही. कुटुंबातील सदस्यासाठी ही लढत मैत्रिपूर्ण होईल. पण महेश सावंत यांच्या रुपात या ठिकाणी उमेदवार जाहीर झाल्यामुळे अमित ठाकरे यांच्यासाठी मोठे आव्हान मानले जात आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली दुसरी यादी; Amit Thackeray यांना माहीममधून उमेदवारी)
माहीम मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेचाच भगवा फडकणार
उमेदवारी जाहीर होताच महेश सावंत यांच्या आनंदास पारावर उरला नव्हता. अत्यंत हास्यमुद्रेने ते प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. त्यांनी सांगितले की, स्वत: उद्धव ठाकरे यांनीच आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता आम्ही जोमाने कामाला लागत आहोत. माहीम हा शिवसेना (UBT) पक्षाचाच बालेकिल्ला आहे. त्यामुळे प्रभादेवी, दादरवर, माहीम येथे ठाकरेंच्या शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे तो फडकविल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. ज्या उत्साहाने आम्ही आता बोलतो आहोत त्याच उत्साहात येत्या 23 नोव्हेंबरलाही आम्ही मोठी रॅली काढू असेही महेश सावंत म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2024: एकनाथ शिंदे गटाची उमेदवारी यादी जाहीर; अमित ठाकरे विरूद्ध माहिम मध्ये सदा सरवणकरांना तिकीट; पहा 45 उमेदवारांची संपूर्ण यादी. )
दरम्यान, या मतदारसंघात तिनही उमेदवार हायहोल्टेज असल्याने तिरंगी लढत होत आहे. खास करुन राज ठाकरे यांच्यासाठी हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. पक्ष स्थापन केलेले वर्ष वगळता त्यांच्या पक्षाला एखाद दुसरा अपवाद वगळता दोन अंकी संख्या ओलांडने तर सोडाच पण दोन ते तीन आमदारही निवडून आणता आले नाहीत. या आधीच्या विधानसभेला राजू पाटील यांच्या रुपात एकच आमदार मिळाला होता. या पार्श्वभूमीवर आता त्यांनी स्वत:चा मुलगाच मैदानात उतरवला आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल, असे मानले जात आहे.