Mahim Vidhan Sabha Constituency: सदा सरवणकर अमित ठाकरे यांच्या विरूद्ध विधानसभा लढवण्यावर ठाम; जाहीर केला नामांकन अर्ज भरण्याची वेळ, तारीख
मनसे कडून अमित यांच्याविरूद्ध उबाठा चे महेश सावंत आणि शिवसेनेकडून सदा सरवणकर यांचे आव्हान आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसे पक्षाने विधानसभेत स्वबळाची घोषणा केली आहे. यामुळेच काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी मध्येही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे. दरम्यान अशाच एक जागांपैकी माहिम विधानसभा मतदारसंघ आहे. मनसे कडून माहिम मध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना तिकीट जाहीर केले आहे पण त्यांच्यासमोर सदा सरवणकर यांना एकनाथ शिंदेंनी शिवसेनेकडून तिकीट दिले आहे. दरम्यान आशिष शेलार यांनी पहिल्यांदा निवडणूकीला उभ्या राहिलेल्या अमित ठाकरेंसाठी महायुती कडून लढत सुकर करण्याच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. त्यामुळे सदा सरवणकर यांच्यावर आता अर्ज मागे घेण्याबाबत दबाब असल्याची चर्चा आहे.
सदा सरवणकर ठाम
एकनाथ शिंदे यांनी बंडाच्या वेळेस साथ दिलेल्या सार्या साथीदारांना तिकीट जाहीर केले ज्यात सदा सरवणकर यांचाही समावेश आहे. दरम्यान आता मनसे कडून अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढत असल्याने सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घेण्याबाबत दबाव वाढत आहे पण सदा सरवणकर हे आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. काल त्यांनी रात्री उशिरा 'वर्षा' वर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. सदा सरवणकर यांनी अद्याप अर्ज दाखल केला नाही. पण आजच्या ऐवजी आता उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबरला सदा सरवणकर अर्ज भरणार आहेत. त्याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना माहिती देताना सोशल मीडीयात खास पोस्ट केली आहे.
माहिम मध्ये तिरंगी लढत होणार आहे. मनसे कडून अमित यांच्याविरूद्ध उबाठा चे महेश सावंत आणि शिवसेनेकडून सदा सरवणकर यांचे आव्हान आहे. 29 ऑक्टोबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तर 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.