Mahesh Jadhav vs MNS: मनसे कडून मराठी कामगार सेना बरखास्त; महेश जाधव यांच्यासह सार्‍या पदाधिकार्‍यांची हकालपट्टी

माथाडी कामगारांची बाजू लावून धरत असल्याने मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावा महेश जाधव यांनी केला.

Mahesh Jadhav vs MNS: मनसे कडून  मराठी कामगार सेना बरखास्त; महेश जाधव यांच्यासह सार्‍या पदाधिकार्‍यांची हकालपट्टी
Raj Thackeray | Insta

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव (Mahesh Jadhav) यांनी मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडीयावर त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार राज ठाकरे आणि अमित ठाकरे असतील असं म्हटलं आहे. महेश जाधवांचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर काल रात्री उशिरा मनसेने याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करत महेश जाधव यांच्यासह कामगार सेनेला बरखास्त केले आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.असं बाळा नांदगावकरांच्या स्वाक्षरीचं पत्र त्यांनी शेअर केले आहे.

महेश जाधव यांच्या या आरोपांनंतर काल (9 जानेवारी) नवी मुंबईत मोठा राडा झाला. महेश जाधव समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. माथाडी कामगार महेश जाधव यांच्या समर्थनार्थ मेरी कव्हर रुग्णालयाजवळ राडा केला.

पहा पत्रक

माथाडी कामगारांची बाजू लावून धरत असल्याने मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावा महेश जाधव यांनी केला. तर संदीप देशपांडे यांनी मीडीयाशी बोलताना या प्रकरणी प्रतिक्रिया देताना महेश जाधवांबाबत अनेक प्रकारी येत होत्या. त्याबाबत विचारणा करण्यासाठी राजगड वर अमित ठाकरेंनी महेश यांना बोलवलं असता त्यांच्याकडून अमित ठाकरेंना चूकीची आणि उलटसूलट उत्तरं देण्यात आली त्यानंतर उपस्थित मनसैनिकांनी हात उचलला असल्याचं ते म्हणाले आहेत.