IPL Auction 2025 Live

Ulhasnagar Firing Case: उल्हासनगर गोळीबार प्रकरण, महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक

त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

Mahesh Gaikwad PC Twitter

शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर शुक्रवारी रात्री उल्हासनगर (Ulhasnagar) येथील हिललाईन पोलीस ठाण्यात (Hillline Police Station) गोळीबार झाला होता. त्यानंतर गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महेश गायकवाड यांच्या तब्येतीच्या बाबात माहिती दिली.  महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या असल्या तरी त्यांची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.  (हेही वाचा - Ganpat Gaikwad Atrocity Case: भाजप आमदार गणपत गायकवाड विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल)

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी दुपारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस डॉक्टरांकडे केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केवळ महेश गायकवाड यांना पाहिले. डाॅक्टरांकडून योग्य ते उपचार केले जात असल्याचे त्यांनी म्हटले.

काय आहे प्रकरण?

भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. या दोघांच्या दरम्यान एका 50 गुंठे जमिनीवरून वाद सुरु होता. शुक्रवारी हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी गणपत गायकवाड यांचा मुलगा देखील पोलीस ठाण्यात होता. मात्र पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत स्वतः गणपत गायकवाड पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी थेट शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.