Mahatrashtra Colleges Reopen from Today: राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरु, ऑनलाईन सत्र परीक्षा असलेल्या कॉलेजेसना दिवाळीनंतरचा मुहूर्त
आजपासून राज्यातील गेडी दिड वर्षे बंद असलेली महाविद्यालये पुन्हा एकदा ऑफलाईन सुरु (Mahatrashtra Colleges Reopen from Today) होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने महाविद्यालय पुन्हा एकदा बहरले जाणार आहे.
राज्यातील महाविद्याल परिसरात आज (20 ऑक्टोबर) लगबग पाहायला मिळत आहे. आजपासून राज्यातील गेडी दिड वर्षे बंद असलेली महाविद्यालये पुन्हा एकदा ऑफलाईन सुरु (Mahatrashtra Colleges Reopen from Today) होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने महाविद्यालय पुन्हा एकदा बहरले जाणार आहे.राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरु होत असली तरी कोरोना निर्बंध कायम असल्याने आजही ही उपस्थिती मर्यादीतच असणार आहे. तसेच, कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थी, पालक आणि कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, सध्या ऑनलाईन सत्र परीक्षा (Online Session Exams) सुरु आहेत. त्यामुळे दिवाळी नंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्यातील अनेक महाविद्यालयांनी घेतला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर (Diwali 2021) विद्यालयांतील गर्दी पुन्हा बहरण्याची शक्यता आहे.
कोरोना महामारीची पहिली लाट ओसरल्यावर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालये सुरु झाली होती. मात्र, अल्पावधीतच दुसरी लाट आली. त्यामुळे सुरु झालेली महाविद्यालये पुन्हा बंद झाली. शहरात कोरोना प्रादुर्भाव कायम असल्याने महाविद्यालये सलग बंदच होती. शहरातील महाविद्यालयांना सुरु होण्यास उसंतच नाही मिळाली. त्यामुळे जवळपास सर्वत महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. (हेही वाचा, Maharashtra Supplementary Exam Results: इयत्ता 10, 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल कुठे पाहाल?)
विद्यालये सुरु करण्यासाठी खबरदारी
- महाविद्यालयात येणाऱ्या आणि 18 वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असणे आवश्यक.
- प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्याथ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध.
- महाविद्यालयात केवळ 50% इतकीच उपस्थिती मर्यादा. वसतीगृहे, उपहारगृहे टप्प्याटप्याने सुरु होणार.
- लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.
सध्यास्थितीत अनेक महाविद्यालयांचे ऑनलाईन सत्र पूर्ण होत आहे. त्या महाविद्यालयांचे ऑनलाईन परीक्षा सत्र पार पडत आहे. या महाविद्यालयांनी आजपासून (20 ऑक्टोबर) प्रत्यक्ष महाविद्यालय सुरु करण्यास असमर्थता दर्शवली. ही महाविद्यालये दिवाळीनंतर प्रत्यक्ष विद्यालये सुरु करण्याची शक्यता आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षीक परिक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे.