Maharojgar Mela at Mumbai: राज्य सरकारकडून तरुणांना रोजगाराची मोठी संधी! रोजगाराच्या ७ हजार संधी असलेला भव्य रोजगार मेळाव्याचं मुंबईत आयोजन

महाराष्ट्र सरकारकडून आज मुंबईत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यात तब्बल ७ हजार नोकऱ्या दिल्या जाणार आहे.

Mantralay (Photo Credits : Facebook)

राज्यभरात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी आहे. अनेक तरुण पदवी किंवा पद्युत्तर शिक्षण घेवून देखील बेरोजगार आहेत. सरकारी नोकरी तर लांब पण खासगी नोकऱ्या देखील मिळणं हल्ली अवघड झालं आहे. विविध शाखेतील तरुण नोकेरीच्या शोधात आहेत. तरी आता राज्य सरकारकडून या सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार सुवर्णसंधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून आज मुंबईत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यात तब्बल ७ हजार नोकऱ्या दिल्या जाणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास हजर राहण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. विविध क्षेत्र तसेच विविध शाखेतील नोकऱ्या या मेळाव्यात उपलब्ध आहेत. तसेच या मेळाव्यात उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामुळे फक्त या मेळाव्यातचं नाही तर बाहेर देखील या उमेदवारांना नोकरी शोधण सहज शक्य होईल.

 

मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आज सकाळी 10 वाजेपासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, 3 महापालिका मार्ग, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरिया, फोर्ट, मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मुंबई शहरातील नामांकीत कंपनींचे प्रतिनिधी उपस्थित राहुन उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. तरी तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास हजर राहण्याचं आवाहन राज्यमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. (हे ही वाचा:- UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी जाहीर केली भरती प्रक्रिया; उमेदवाराला मिळणार 7 व्या वेतन आयोगानुसार पगार)

 

दहावी (SSC), बारावी (HSC), पदवीधर (Graduate), आयटीआय (ITI), पॉलिटेक्नीक (Polytechnic), इंजिनीअरींग पदवी (Engineering) पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिंग (Banking), आयटीआयएस (ITIS), टुरिझम (Tourism), हॉस्पीटीलिटी (Hospitality), एचआर अॅप्रेंटीसशीप, डोमॅस्टिक वर्कर (Domestic Worker), इलेक्ट्राॅनिक्स (Electronics), मॅनेजमेंट (Management) तसेच मिडीया ऍण्ड एन्टरटेंमेंट (Media And Entertainment) अशा विविध क्षेत्रात एकूण ७ हजार नोकरभरती या भव्यदिव्य मेळाव्याच्या माध्यमातून केला जाणार असल्याची माहिती मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी दिली आहे.