MahaRERA कडून 20 हजार Real Estate Agents चं रजिस्ट्रेशन रद्द

MahaRERA कडे 47 हजार एजंट्सचे रजिस्ट्रेशन आहे. या वर्षीच्या सुरूवातीला महारेरा ने 13,785 रिअल इस्टेट एजंट्सचं रजिस्ट्रेशन रद्द केलं आहे.

MahaRERA | X

Cancellation of Agents License: महारेरा (MahaRERA) कडून 1 जानेवारी 2024 पासून इस्टेट एजंटस (Real Estate Agents) ना ट्रेनिंग घेणं, परीक्षा देणं आणि त्यांचं सर्टिफिकेट्स रजिस्टर करणं बंधनकारक केलं आहे. हे नियम न पाळणार्‍यांना पुढे त्यांचा व्यवसाय करता येणार नाही. याअंतर्गत सुमारे 20 हजार इस्टेट एजंट वर महारेरा कडून कारवाई करण्यात आली आहे. त्यमधील एक फॅक्टर म्हणजे अनेकांनी महारेरा च्या वेबसाईट वर सर्टिफिकेट अपलोड केलेले नाही. त्यामुळे वर्षभरासाठी त्यांचे रजिस्ट्रेशन बंद करण्यात आले आहे.

जे एजंट वर्षभरामध्ये ट्रेनिंग पूर्ण करून आपलं सर्टिफिकेट मिळवून ते अपलोड करू शकतील त्यांना लायसंस रिन्यू देखील करून मिळणार आहे. मात्र जे नियमांचे पालन करून सारे टप्पे पार करणार नाहीत त्यांचे लायसन्स रद्द केले जाणार आहे. त्यानंतरही 6 महिने त्यांना नव्याने रजिस्ट्रेशन देखील करता येणार नाही. परिणाम्की त्यांचे रिअल इस्टेट मधील व्यवहार बंद होणार आहेत.

MahaRERA कडे 47 हजार एजंट्सचे रजिस्ट्रेशन आहे. या वर्षीच्या सुरूवातीला महारेरा ने 13,785 रिअल इस्टेट एजंट्सचं रजिस्ट्रेशन रद्द केलं आहे. यामध्ये त्यांनी लायसंस रिन्यू केलेले नाही. असे महारेरा सांगते. यापूर्वी नोंदणी केलेल्या अनेक लोकांनी महारेराकडे अपील केले आहे की ते त्यांची एजंट म्हणून नोंदणी रद्द करू इच्छितात. रिअल इस्टेट एजंटना प्रणालीतून बाहेर पडण्याची परवानगी देण्याची खरी गरज लक्षात घेऊन, महारेराने नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया जाहीर केली आहे. MahaRERA QR Code: गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींसोबत क्यूआर कोड बंधनकारक; 1 ऑगस्टपासून नियम लागू .

जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या रिअल इस्टेट एजंटविरुद्ध तक्रार दाखल केली, ज्याच्या नोंदणी रद्द करण्याच्या अर्जाला परवानगी आहे, तर पीडित व्यक्ती महारेराकडे संपर्क साधू शकते आणि प्राधिकरण आवश्यक निर्णय घेईल आणि संबंधित एजंटला ते बंधनकारक असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement