Nanded Shocked: मुलीसोबत, गर्भवती पत्नीचा गळा आवळून केला खून, घटनेनंतर आरोपी पोलिस ठाण्यात

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आठ महिन्याच्या गर्भवती महिलेसह 3 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे

Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

Nanded Shocked: महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आठ महिन्याच्या गर्भवती महिलेसह 3 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने गर्भवती पत्नीचा आणि मुलीचा खून केल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजार झाला आहे. पोलीसांनी या घटनेचा धक्कादायक खुलासा केला आहे. दुसरी मुलगी नको असल्याने आरोपीने हे कृत्य केले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एक सैनिक आहे. गुरुवारी आरोपीने कंधार तालुक्यातील बोरी येथे राहत्या ठिकाणी पत्नीचा आणि मुलीचा खून केला. या घटनेमुळ परिसरात मोठी शोककला पसरली आहे. आरोपी घटने नंतर माळाकोळी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. मृत पत्नीच्या आई वडिलांनी आरोपीवर हत्या केल्याचा आरोप केला आहे. एकनाथ जायभाये असं आरोपीचे नाव आहे. पोलीस ठाण्यात आरोपीच्या आई आणि वडिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुला मुलीच होतात या कारणांवरून हत्या केली असा आरोपी करण्यात आला आहे.

आरोपीने पत्नीला त्रास दिल्याची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली. आरोपीने घर बांधकामासाठी माहेरहून ४ लाख रुपयये घेऊन ये अशी मागणी घातली होती. पत्नीने याला नकार दिला तर काही दिवसांनी ती  गरोदर असल्याची माहिती मिळाली. सासरच्या मंडळीने तीला तपासणी करण्यास सांगितले याला महिलेचा विरोध होता. तुला मुलगीच होणार असा छळ देखील केला.

आरोपीने झोपलेल्या अवस्थेत असाताना पत्नी आणि ३ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली. या घटनेनंतर आरोपी पोलिस ठाण्यात दाखल झाला. ही घटना गावात पसरताच गावकरी हादरले. सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.