
Delhi Girl Raped in Mumbai: महिलांवरचे अत्याचार दिवसेदिवस वाढत चालले आहे. दरम्यान दिल्लीतील एका तरुणीवर मुंबईत मित्राने तीच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबईत फिरण्यासाठी आलेली असताना तीच्यावर उद्योगपती मित्राने अत्याचार केला. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलीसांत तक्रार दिली. आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. पोलीसांनी शोध घेण्यास सुरू केला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फीलाह असं आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी ही मुंबईत काही दिवसांपुर्वी आली होती. मुंबई फिरण्यासाठी आलेली असताना ती आरोपी व्यावसायिक मित्राच्या घरी थांबली होती. खार पश्चिम येथे पीडित तरुणी मित्रासोबत राहत होती. आरोपीने तीच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तीच्याबर बलात्कार करून तो फरार झाला अशी माहिती पीडीत तरुणीने पोलीसांत दिली. आरोपीने तीला शारिरीक त्रासा दिलाच सोबत तीची मारहाण सुध्दा केली.
पीडित तरुणीने या घटनेची माहिती पोलीसांत दिली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिताची कलम 376 (बलात्कार),354(अ) (लैंगिक छळ), 354(ब) नुसार तसेच कलम 323 अन्वये गुरुवारी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.