Pimpri-Chinchwad: वाल्हेकरवाडी येथील एका बंद खोलीतून येत होता उग्र कुबट वास; दरवाजा तोडल्यानंतर समोरील दृष्य पाहून पोलिसांनाही बसला धक्का

या परिसरातील एका खोलीत 40 वर्षाच्या महिलेसोबत तिच्या 3 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे.

Representational Image | (Photo Credits: PTI)

पिंपरी चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) वाल्हेकरवाडी (Walhekarwadi) परिसरातून सर्वांनाच हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. या परिसरातील एका खोलीत 40 वर्षाच्या महिलेसोबत तिच्या 3 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या मृतदेहाची ओळख पटली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या मायलेकांची हत्या करण्यामागचे नेमके कारण काय आहे? याचाही शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमय्या शेख असे मृत महिलेचे नाव आहे. पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरवाडी परिसरातील एका खोलीत सुमय्या आणि त्यांचा मुलगा आयान याचा मृतदेह सापडला आहे. ज्या खोलीत या दोघांचा मृतदेह सापडला आहे, ती खोली एका व्यक्तीने 15 डिसेंबर रोजी रिक्षाचालक असलेल्या दोन तरूणांना भाड्याने दिली होती. मात्र, बुधवारपासून दोघेजण फरार असल्याचे समजत आहे. यामुळे या खोलीत राहण्याऱ्या रिक्षाचालकांनीच या दोघांची हत्या केली आहे, असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हे देखील वाचा- Nashik Minor Girl Gang Rape Case: नाशिकमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 नराधमांना अटक

सुमय्या आणि आयात ही दोघे मायलेक नेमकी कोठून आली आहेत. तसेच, या ठिकाणी कधीपासून राहत आहेत, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. एका बंद खोलीत उग्र कुबट वास येत असल्याची तक्रार आल्यानंतर स्थानिक पोलिसांना घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी खोलीत माय लेकाचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.