Maharashtra ZP Panchayat Samiti Elections 2021: जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणुकीसाठी आज सहा जिल्ह्यांमध्ये मतदान
जिल्हा परिषेदेच्या एकूण 85 आणि पंचायतसमितीच्या एकूण 144 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडते आहे.
राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये आज (5 ऑक्टोबर) जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. जिल्हा परिषेदेच्या एकूण 85 आणि पंचायतसमितीच्या एकूण 144 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडते आहे. यात धुळे (Dhule), नंदुरबार (Nagpur), अकोला (Akola), वाशीम (Washim), पालघर (Palghar) आणि नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदांचा समावेश आहे. तसेच या जिल्हापरिषदांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचाही त्यात सहभाग आहे सकाळी 7.30 वाजलेपासून मतदानास सुरुवात झाली. सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहील.
कोणत्या जिल्हा परिषद, पंचायत समितीत किती जागांसाठी मतदान?
नागपूर जिल्हा परिषद- 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मतदान पार पडत आहे.
धुळे जिल्हा परिषद- 14 तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी मतदान पार पडत आहे.
पालघर जिल्हा परिषद- 15 तर पंचायत समितीच्या 14 जागांसाठी मतदान पार पडत आहे.
वाशिम जिल्हा परिषद- 14 तर पंचायत समितीच्या 27 जागांसाठी मतदान पार पडत आहे.
अकोला जिल्हा परिषद- 14 तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी मतदान पार पडत आहे.
(हेही वाचा, Palghar: जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी उद्या मतदान)
दरम्यान, आज पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी लगेच उद्या म्हणजेच 6 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडणार आहे. राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्तेत आहे. त्यामुळे हीच आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, राज्यात महाविकासआघाडी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र वेगळे लढण्याचा निर्णय आघाडीतील घटकपक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. त्यामुळे काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी स्वबळावर सामना पाहायला मिळत आहे. राज्यातील या हटके अशा समिकरणाला जनता कशी दाद देते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. उद्या पार पडणाऱ्या मतमोजणीत राज्यातील सहा जिल्ह्यांच्या मतदारांच्या मनात नेमके काय आहे याबाबत निश्चित माहिती मिळू शकणार आहे.