Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Results 2021: धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, पालघर, नागपूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आज मतमोजणी

जिल्हा परिषदेच्या 85 आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी मतदान पार पडले.

Voting (File Image)

राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद (Zilla Parishad Election Results 2021) आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ( Panchayat Samiti Election Results 2021) झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (6 ऑक्टोबर) पार पडत आहे. जिल्हा परिषदेच्या 85 आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी मतदान पार पडले. यात धुळे (Dhule), नंदुरबार (Nagpur), अकोला (Akola), वाशीम (Washim), पालघर (Palghar) आणि नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या मतदानाची आज मोजणी होत आहे. आज सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. राज्यातील कोरोना महामारी स्थिती, राजकारणातील महाविकासआघाडी सारखा महत्त्वपूर्ण प्रयोग या सर्व घडामोडींनंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे राज्याची जनता कोणाच्या हातात सत्ता देणार याबाबत उत्सुकता आहे.

कोणत्या जिल्हा परिषद, पंचायत समितीत किती जागांसाठी मतदान?

नागपूर जिल्हा परिषद- 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांसाठी

धुळे जिल्हा परिषद- 14 तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी

पालघर जिल्हा परिषद- 15 तर पंचायत समितीच्या 14 जागांसाठी

वाशिम जिल्हा परिषद- 14 तर पंचायत समितीच्या 27 जागांसाठी

अकोला जिल्हा परिषद- 14 तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी

(हेही वाचा, Maharashtra ZP Panchayat Samiti Elections 2021: जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणुकीसाठी आज सहा जिल्ह्यांमध्ये मतदान)

जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी (प्राथमिक माहितीनुसार )

धुळे- 60%

नंदुरबार- 65%

अकोला- 63%

वाशीम- 65%

नागपूर- 60%

पालघर- 65%

एकूण सरासरी- 63%

दरम्यान, राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्तेत आहे. त्यामुळे हीच आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, राज्यात महाविकासआघाडी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र वेगळे लढण्याचा निर्णय आघाडीतील घटकपक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. त्यामुळे काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी स्वबळावर सामना पाहायला मिळत आहे. राज्यातील या हटके अशा समिकरणाला जनता कशी दाद देते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. उद्या पार पडणाऱ्या मतमोजणीत राज्यातील सहा जिल्ह्यांच्या मतदारांच्या मनात नेमके काय आहे याबाबत निश्चित माहिती मिळू शकणार आहे.