Maharashtra Winter Update: महाराष्ट्रातील जनतेला हुडहुडी! पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कायम, जाणून घ्या कुठल्या राज्यात किती तापमान
हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात राज्यात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना हुडहूडी तर भरलीचं आहे पण राज्यातील विविध मुख्य शहरांमध्ये कडाक्याची थंडी पडत असल्याचं चित्र आहे. मुंबई, पुणे, नाशिक,कोल्हापुर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मुख्य शहरांमध्ये तापमानात कमालीची घसरण बघायला मिळाली आहे. तरी मकर संक्रांतीनंतर राज्यात हुडहूडी भरणारी थंडी जाणवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तरी येणारे पुढील दोन आठवडे थंडीचा जोर कायम असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. ग्रामीण भाग आणि डोंगरकपाऱ्यांमध्ये धुके पसरत आहे. काही ठिकाणी पारा निचांकी पोहोचला आहे. दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी थंडीने चांगलीच हुडहीडी भरवली आहे. त्यामुळे जागोजागी शेकोट्या पाहायला मिळत आहे.
देशातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. पंजाबच्या अनेक भागात दाट धुके कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या विविध भागात धुके पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये अचानक थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर भारतात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या तीन ते चार दिवसात उत्तर-पश्चिम भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. (हे ही वाचा:- Mumbai Temperature Update: मुंबईत हुडहुडी वाढली; पारा 13.8 अंश सेल्सिअवर, यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद)
जाणून घ्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान:-
जळगाव - १०
कोल्हापूर – १६.९
उद्गगिर- १५
सातारा- १२.७
नांदेड- १५.४
जालना- १४
नाशिक- १०.५
औरंगाबाद- १०
डाहाणू- १३.२
मालेगाव- १३.८
पुणे- १०.८
रत्नागिरी- १६
सोलापूर- १५.५
परभणी- १३
माथेरान- १३.८
बारामती- १२.२
सांगली- १५. १