Maharahstra Monsoon 2019: पूरग्रस्तांना दिलासा; मुंबई, महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार
तर, केरळमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. या राज्यात हवामान मात्र कोरडे राहील. छत्तीसगड, अंदमान-निकोबार बेटांवरही मध्यम स्वरपाचा पाऊस अपेक्षीत असल्याचा स्कायमेटचा अंदाज आहे.
Maharahstra Monsoon 2019: मुसळधार पाऊस आणि महापुराच्या विळख्यात अडकलेल्या महाराष्ट्रासाठी आनंदाची तर ऐन पावसाळ्यातही पाणीटंचाईचे चटके सोसणाऱ्या नागरिकांसाठी एक वाईट बातमी आहे. मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रात आता पावसाचा जोर कमी होईल. मात्र, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. स्कायमेट ही खासगी वेधशाळा असून, हवामानाचा अंदाज आणि पर्यावरणाबाबत अद्यावत माहिती सातत्याने पूरवत असते.
दरम्यान, दक्षिण कोकण आणि गोव्यात हलक्या ते मध्यम क्षमतेची पर्जन्यवृष्टी होईल. तसेच, संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर पूर्णपणे कमी होईल. मात्र, अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असे स्कायमेटने आपल्या अंदाजात म्हटले आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पावसाचा जोर कमी होऊन मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यात आहे. मात्र, पावसाची अधूनमधून एखादी दुसरी मोठी सरही येण्याची शक्याता नाकारता येणार नाही, असेही स्कायमेटने म्हटले आहे.
स्कायमेट ट्विट
महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य गुजरातमध्येही पावसाचे प्रमाण कमी होऊन तेथे मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर, केरळमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. या राज्यात हवामान मात्र कोरडे राहील. छत्तीसगड, अंदमान-निकोबार बेटांवरही मध्यम स्वरपाचा पाऊस अपेक्षीत असल्याचा स्कायमेटचा अंदाज आहे. (हेही वाचा, Flood in Sangli: भाजपची सत्ता असलेल्या दोन राज्यांतील मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव; परिणामी सांगली शहरात महापूर)
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातरा आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग आदी ठिकाणी अद्यापही पाऊस आणि पूराचा मुक्काम कायम आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी, पूरस्थिती कायम आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि नंदुरबार जिल्ह्यातील पऊस थांबला म्हणून काही या ठिकाणची पूरस्थिती कमी झाली असे मुळीच नाही. कर्नाटक (Karnataka) राज्यातील आलमट्टी (Almatti Dam) धरणातील पाण्याचा विसर्ग न वाढवल्याने सांगली शहर आणि जिल्ह्यात आजही पाणीच पाणी पाहायला मिळते आहे.