'महाराष्ट्रात पुढील 50 वर्षे महाविकास आघाडीचे सरकार कायम राहील'– उद्धव ठाकरे

तसेच हे सरकार जास्त काळ टिकणार नाही तर, असे विधान विरोधी पक्षातील नेते वारंवार करत आहेत.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रावादी यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन झाले आहे. तसेच हे सरकार जास्त काळ टिकणार नाही तर, असे विधान विरोधी पक्षातील नेते वारंवार करत आहेत. यातच सोमवारपासून राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरुवात होणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नागपूरात (Nagpur) दाखल झाले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाविकास आघाडीचे सरकार केवळ 5 वर्ष नाही तर, पुढील 50 महाविकास आघाडीचे सरकार कायम राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी केले आहे,

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे आज महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी आगमन झाले. यावेळी जनतेने त्यांचे प्रचंड उत्साहाने आणि जल्लोषाने स्वागत केले. या पार्श्वभूमीवर त्यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. माझ्याकडे महाराष्ट्रातील जनतेचे आशिर्वाद आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण हा संपूर्ण महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्राला देशाला अभिमान वाटेल असे सरकार, शासन आम्ही चालवू. जर आपण एकत्र आलो तर, हे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर 25 वर्षेच काय 50 वर्षे आणि पिढ्यान पिढ्या कायम राहिले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री म्हणून आता माझी कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु होत आहे, त्यामुळे तुमचे आशिर्वाद असेच कायम राहू द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले. हे देखील वाचा- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत भडकले; म्हणाले...

उद्धव ठाकरे यांचे ट्वीट-

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी तिन्ही पक्षाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. परंतु, शिवसेना आणि काँग्रेस परस्पर विरोधी विचारधारेचे असून त्यांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी शक्यता विरोधी पक्षातील नेत्यांनी वर्तवली होती. परंतु, उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.