मुंबईमध्ये तापमानाचा पारा घसरला; पुढील 2 दिवस थंडी कायम राहणार हवामान खात्याचा अंदाज
मुंबईप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रातदेखील तापमानाचा पारा घसरणार असून नागरिकांनी थंडीपासून रक्षण करण्यासाठी पुरेशी काळजी घ्यावी.
Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात यंदा रेंगाळलेला मान्सून आणि वातावरणातील बदलांमुळे थंडीचं आगमनही यंदा थोडं उशिरानेच झालं. महाराष्ट्रात थंडीचा पारा खालावत असला तरीही मुंबईमध्ये वातावरणात गारवा येऊन जाऊन होता. मागील काही दिवसांपासून मुंबईकरांना सकाळ आणि संध्याकाळीदेखील हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे. सध्या हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये तापमान 15 अंश इतके खाली गेले आहे तर कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार तापमान 19 अंश इतके नोंदवण्यात आले आहे. पुढील काही दिवस मुंबईकरांना हवेत अशाचप्रकारे थंडावा जाणवणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
काल (15 जानेवारी) पासून मुंबईमध्ये तापामानाचा पारा घसरला आहे. मुंबईप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रातदेखील तापमानाचा पारा घसरणार असून नागरिकांनी थंडीपासून रक्षण करण्यासाठी पुरेशी काळजी घ्यावी. Winter Health Tips: हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने होतील 'हे' फायदे.
दरम्यान यंदा उत्तर महाराष्ट्रामध्येही थंडीचा पारा कमालीचा खाली उतरला आहे. तेथे थंडीने मागील 100 वर्षांमधील निच्चांक गाठला होता. सध्या उत्तर भारतामध्येही वातावरणात थंडावा जाणवत आहे.