Maharashtra Weather Updates: पुणे, नाशिक, अहमदनगर मध्ये थंडीचा कडाका, तापमान 10 अंशाच्या खाली; पहा राज्यातील महत्त्वाच्या शहरातील आजचं तापमान
हे यंदाच्या थंडीमधील पुण्यातील निच्चांकी तापमान आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वत्रच थंडीचा कडाका जाणवत आहे. मागील काही आठवड्यात थंडीच्या दिवसात पडलेला अवकाळी पाऊस आणि पश्चिम किनारपट्टीवरून गेलेले बलुचिस्तान धूळीचं वादळ यामुळे गारवा वाढला होता. शनिवार 22 जानेवारीपासून जाणवत असलेला हा गारवा आजही कायम आहे. राज्यात पुणे (Pune), नाशिक (Nashik), अहमदनगर (Ahmednagar) मध्ये किमान तापमान 10 अंशाच्या खाली नोंदवण्यात आले आहे.
आयएमडीचे के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज सकाळी किमान तापमान 15 अंश सेल्सियसच्या जवळ नोंदवण्यात आले आहे तर पुण्यात हे 9.4 अंश सेल्सिअस, नाशिक मध्ये 7.6 अंश सेल्सिअस आणि जळगाव मध्ये 5 अंश सेल्सिअस तापमान आहे. मराठवाडा भागामध्ये 10.8, माथेरान मध्ये 13.4, सातारा मध्ये 13.6, सांगली मध्ये 13.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे देखील नक्की वाचा: Mumbai Winter Funny Memes: मुंबईत अवकाळी पावसानंतर वाढलेल्या थंडीमुळे सोशल मीडियावर नेटिझन्सकडून मजेशीर मिम्सचा वर्षाव!
K S Hosalikar ट्वीट
पुण्यात काल (25 जानेवारी) 8.5 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवण्यात आले होते. हे यंदाच्या थंडीमधील पुण्यातील निच्चांकी तापमान आहे. नाशिक मध्येही 6.3 आणि अहमदनगर मध्ये 7.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात पुढील काही दिवस थंडी जाणवेल आणि हळूहळू तापमानामध्ये वाढ होईल असे सांगण्यात आले आहे.