Maharashtra Weather Updates: उत्तर महाराष्ट्रात,विदर्भात किमान तापमानामध्ये घट; मुंबईकरांची सकाळही गारव्यात; पहा तुमच्या जिल्ह्यातील तापमान

पहाटे दिल्लीत धुक्याचं वातावरण आहे. दरम्यान आज दिल्लीमधील वातावरण 6.8 डिग्री इतके नोंदवण्यात आले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

महाराष्ट्रात ऐन जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यानंतर किमान तापमानात झालेली वाढ पुन्हा खालावली आहे. हवामान वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील 2 दिवसांपासून राज्यात पुन्हा थंडीचा गारावा वाढला आहे. ठाण्यातील ऐरोली भागामाध्ये आज सकाळी दाट धुकं असल्याने दृश्यमानता देखील कमी झालेली पहायला मिळाली होती. दरम्यान सध्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या राज्यातील काही भागांमध्ये तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. तर मुंबईकरांची देखील आजची सकाळ थंडीच्या गारव्यामध्ये झाली आहे. Maharashtra Weather Forecast: राज्यात 20 जानेवारी पासून किमान तापमान घट होण्याची शक्यता; मुंबई, ठाण्यात 16° चा अंदाज.

मुंबई मध्ये आज (22 जानेवारी) तापामान 17 अंश डिग्री इतकं नोंदवण्यात आले आहे. तर नाशिक मध्ये 12, जळगाव मध्ये 10.7, डहाणू मध्ये 16.5, पुण्यात 13.7, मराठवाड्यात 15.4, बारामती मध्ये 14.9, माथेरान मध्ये 17.6 तर निच्चांकी गोंदियामध्ये 9.6 इतकं नोंदवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात जिल्ह्यानुसार तापमान किती?

दरम्यान महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवस अशाच प्रकारे वातावरणामध्ये घट होईल असे सांगण्यात आले आहे. उत्तर भारतामध्ये अजूनही थंडीचा कडाका कायम आहे. पहाटे दिल्लीत धुक्याचं वातावरण आहे. दरम्यान आज दिल्लीमधील वातावरण 6.8 डिग्री इतके नोंदवण्यात आले आहे.