Maharashtra Weather Update: मुंबई सह राज्यात येत्या 2-3 दिवसांत गडगडाटासह पाऊस बरसणार: हवामान खात्याचा अंदाज

पण या चक्रीवादळामुळे पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Maharashtra Monsoon 2019 | File Image

डिसेंबर माहिना उजडला तरीही महाराष्ट्रात ऋतूमानानुसार हिवाळा किंवा थंडी जाणावत नसली तरीही आता येत्या 2-3 दिवसांमध्ये मध्यम ते किरकोळ पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याकडून (IMD) जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात किमान तापमानात घट होत असली तरीही कमाल तापमान चढेच आहे. त्यामुळे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पावसाची सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच गडगडाटाची शक्यता आहे.

अरबी समुद्रामध्ये दक्षिण पश्चिम दिशेला कमी दाबाच्या क्षेत्राचे येत्या 3 दिवसामध्ये चक्रीवादळामध्ये रूपांतर झाल्यास ते सोमालियाच्या बाजूने सरकण्याची शक्यता आहे. पण या चक्रीवादळामुळे येत्या काही दिवसात कोकण किनारपट्टीसह औरंगाबाद, परभणी, बीड, जालना, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये वादळी वारा, गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंंबई मध्येही थंडीची चाहुल; नोव्हेंबर महिन्यातील किमान तापमान 21.4

मुंबईमध्ये सध्या कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवण्यात आले आहे. तर किमान तापमान 23.4 अंश सेल्सिअस आहे. मुंबईसह राज्यात अद्याप थंडी जाणवत नसली तरीही 2 डिसेंबरच्या सकाळी राज्यात अहमदनगरमध्ये सर्वाधिक तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे.