Maharashtra Weather Updates: कोकण, मध्य महाराष्ट्रात दिवाळी नंतर हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता

सध्या पश्चिम हिमालय भागामध्ये वेस्टर्न डिस्टंबन्स आणि पूर्वेकडील जोरदार वारा यामुळे नॉर्थइस्ट मान्सून अ‍ॅक्टिव्ह झाला आहे.

Maharashtra Rains Update | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra)  मागील आठवड्यात घसरलेलं तापमान आता पुन्हा वाढलं आहे. दरम्यान हवामान विभागाने (IMD)  वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra), कोकण (Konkan), मराठवाडा (Marathwada) परिसरामध्ये दिवाळीनंतर(Diwali) म्हणजेच 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. हलक्या पावासाच्या सरी आणि मेघगर्जना होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे सह महाराष्ट्राच्या इतर अनेक भागामध्ये रात्रीच्या वेळेस थंडावा जाणवणार आहे.

उत्तर भारतामधून वाहणारे गार वारे आणि पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेली स्थिती यामुळे आता महाराष्ट्र आणि नजिकच्या भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत वातावरण कोरडे राहणार आहे मात्र त्यानंतर वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस बरसू शकतो. सध्या उत्तर भारतामध्ये स्नो फॉल म्हणजेच बर्फ पडण्यास सुरूवात झाली आहे. उत्तरा भारतातील वातावरणीय बदलामुळे 14 ते 16 नोव्हेंबर या काळामध्ये किमान तापमानामध्ये वाढ होणार आहे.

पुणे शहरामध्येही वातावरण कोरडे राहणार आहे. 21-22 नोव्हेंबर पर्यंत पुणे शहरातही रात्रीचं तापमान 16-18 अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता वर्तववण्यात आली आहे. सध्या पश्चिम हिमालय भागामध्ये वेस्टर्न डिस्टंबन्स आणि पूर्वेकडील जोरदार वारा यामुळे नॉर्थइस्ट मान्सून अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. यंदा अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार शेतकर्‍यांना झालेल्या  नुकसानीचा आढावा घेऊन मदतीचा हात पुढे करत आहे.